कल्याणमध्ये धोका वाढला, कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

कल्याणमध्ये धोका वाढला, कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

कल्याणमधील गोळवली गावात एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

कल्याण, 29 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण संख्या असून उपनगरातही कोरोनाने थैमान  घातले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात कोरोनाने चौथा बळी घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील गोळवली गावात एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  या महिलेच्या घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

हेही वाचा -पुण्यात कोरोनाचे आकडे सतत वाढत असताना ससूनमधून आली 'गुड न्यूज'

तसंच, या महिलेच्या जी जी लोकं संपर्कात आली होती, त्यांची यादी गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

दरम्यान, आज 28 एप्रिल रोजी प्राप्‍त झालेल्‍या माहितीनुसार, कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आणखी नवीन 6 रुग्ण आढळून आले होते. आढळलेल्या या 6 रुग्णामध्ये बहुतांश रुग्ण हे मुंबईत काम करणारे असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहाराचा समावेश आहे.

हेही वाचा - वारंवार धुतल्याने हात झाले ड्राय, घरगुती उपायांनी पुन्हा होतील सॉफ्ट सॉफ्ट

मुंबईत काम करणारा हॉटेलचा कर्मचारी, भाजी मंडईतील सुरक्षा रक्षक, दादर इथं खाजगी कंपनीचा अभियंता आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यात एका 12 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे

महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 143 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी   45 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना  डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर  एकूण 95 रुग्णावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत केडीएमसीच्या परिसरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संपादन - सचिन साळवे

 

First Published: Apr 29, 2020 09:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading