भारतात पोलिसांपेक्षा गायीचा जीव महत्त्वाचा - नसरुद्दीन शाह

भारतात पोलिसांपेक्षा गायीचा जीव महत्त्वाचा - नसरुद्दीन शाह

'आम्ही मुलांना फक्त माणूसकीचाच धर्म शिकवला. त्यामुळं त्यांना इतर धर्म माहितच नाहीत.'

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर :  देशात वाढत असलेली असहिष्णुता आणि मॉबलिंचिंगच्या घटनांवर प्रसिद्ध अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. समाज म्हणून आपण कुठे जात आहोत याचा विचार केला पाहिजे असं ते म्हणाले. बुलंदशहरमध्ये घडलेल्या हिंसाचारावरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या देशात पोलिसांच्या जीवापेक्षा गायीच्या जीवाला जास्त महत्त्व आलं आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

शाह आपल्या सडेतोड विचारांसाठी ओळखले जातात. ते म्हणाले, मला नेहमी भीती वाटते की कधी संतप्त जमावाने माझ्या मुलाला पकडलं आणि विचारलं की तुझा धर्म कुठला आहे? हिंदू की मुस्लिम? तर तो काय उत्तर देणार? कारण आम्ही मुलांना फक्त माणूसकीचाच धर्म शिकवला. त्यामुळं त्यांना इतर धर्म माहितच नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

काय घडलं होतं बुलंदशहरमध्ये?

उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर इथं 3 डिसेंबरला गोमांस सापडल्याच्या अफवेवरून हिंसाचार उफाळला होता. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. लष्कारतून सुट्टीवर आलेल्या एका जवानानेच गावठी पिस्तुलातून गोळी झाडून सुबोधकुमार सिंह या पोलिस अधिकाऱ्याची हत्या केल्याचं नंतर सिद्ध झालं.

बुलंदशहर जवळच्या एका शेतात मांसचे तुकडे सापडले होते.  गायीची हत्या करून तिचे तुकडे केल्याची अफवा लगेच पसरली त्यामुळं नागरिक संतप्त झाले. त्यांनी ते मांस एका ट्रॅक्टरमध्ये टाकून मुख्य रस्ता जाम केला. संतप्त नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक उडाली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलीस आणि नागरिकांच्या संघर्षात एका युवकालाही गोळी लागली होती.

बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझं लेकरू परत कोण आणून देणार', आईने फोडला हंबरडा

 

First published: December 20, 2018, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading