नवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

नवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

बुधवारी नवी मुंबईत ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या आंदोलनात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 26 जुलै :  महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नवी मुंबईत ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या आंदोलनात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या डोक्याला काल मार लागला होता,त्यानंतर त्याला जेजे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मराठा आरक्षणासाठी तावडेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

नवी मुंबईत बंद दरम्यान मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. नवीमुंबई भागातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी आणि कळंबोली भागात मोठ्या प्रमाणात गाड्यांची जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. अनेक दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. यामुळे नवी मुंबईत आजही तणावपूर्ण शांतता असून या सगळ्याच परिसरात दुकानं बंद ठेवण्यात आली होती.  कोपर खैरणे इथं झालेल्या आंदोलनात जखमी झालेल्या  एकाचा मृत्यू झालाय. त्याच्या डोक्याला मार लागल्याने जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.

ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून आज इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अफवा पसरवली जाऊ नये यासाठी हा खबरदारीचा उपाय योजला गेलाय.

VIDEO : धावत्या ट्रकखाली त्याने दिले झोकून,थरकाप उडवणारे दृश्य सीसीटीव्हीत

दरम्यान,मराठा आरक्षणाबाबत गेल्या चार दिवसांपासून मराठा ठोक आंदोलनाचा राज्यभरात वनवा पेटला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्री आणि मराठा आमदारांची बैठक बोलावली आहे.  मराठा आरक्षण संदर्भात भाजपाची बैठक शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन ' या निवासस्थानी होत आहे. सहकारमंत्री  सुभाष देशमुख, आमदार रवींद्र चव्हाण, गृहमंत्री रणजीत पाटील, बबनराव लोणीकर, भाजपचे आमदार आशिष शेलार तावडे यांच्या बंगल्यावर पोहचले आहे. त्याआधी 'वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. काही वेळेत मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील हे सेवासदन इथं पोहोचणार आहे.

VIDEO : व्हायरल झालेल्या 'त्या' पोलिसाच्या फोटोची दुसरी बाजू !

दरम्यान, आज दिवसभरात राज्यात आमदारांचे राजीनामा सत्र सुरुच असून, मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणी ते सध्या मुंबईच्या ऑथर रोड तुरूंगात असून, त्यांनी थेट तुरूंगातुनच आपला राजीनामा विधान सभा अध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे. राज्यात आमदारांनी सुरु केलेल्या या स्टंटबाजीमुळे मराठा आंदोलनाला एक वेगळं वळण, एक वेगळी दिशा मिळाली आहे.

मराठा आरक्षण नावांखाली शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे चिकटगावकर, भाजपच्या सीमा हिरे आणि पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.

 

First published: July 26, 2018, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading