सेल्फी जीवावर बेतला,आई-वडिलांसह मुलगा गेला नदीत वाहून!

सेल्फीच्या नादात एक कुटुंब नदीत वाहुन गेल्याची दुर्दैवी घटना बुलडाण्यात घडलीये.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2018 07:27 PM IST

सेल्फी जीवावर बेतला,आई-वडिलांसह मुलगा गेला नदीत वाहून!

बुलडाणा,22 आॅगस्ट : सेल्फीच्या नादात एक कुटुंब नदीत वाहुन गेल्याची दुर्दैवी घटना बुलडाण्यात घडलीये.   खिरोडा  येथील पूर्णा नदीच्या पाण्याजवळ सेल्फी काढताना तिघे जण वाहुन गेले. यात 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

जळगाव जामोद तालुल्यातील येथील राजेश चव्हाण हे आपल्या कुटुंबासह शेगाव इथं येणार होते. शेगावकडे येताना खिरोडा नजीक पूर्णा नदीचा पूल लागला. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नदी दुथुंडी भरून वाहतेय.

राजेश चव्हाण यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या पत्नी आणि 10 वर्षांच्या मुलासह नदीच्या किनाऱ्यावरून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलाचा पाय नदीत घसरून तो पडला. त्याला वाचवण्यासाठी राजेश यांनी नदीत उडी मारली त्यापाठोपाठ त्यांच्या पत्नीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण नदीच्या पाण्याला वेग असल्यामुळे तिघेही वाहून गेले.

हा संपूर्ण प्रकार या पुलावरून जाणाऱ्या स्थानिकांच्या लक्षात आला काहींनी यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला मात्र त्यांना यश आलं नाही. स्थानिकांना सोबत घेऊन पोलीस प्रशासन या तिघांचा शोध घेत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने यांचा अद्याप थांगपत्ता लागला नाही.

--------------------------------------------------------

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close