• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • LIC च्या सर्व पॉलिसी होल्डर्ससाठी महत्त्वाची सूचना, आता अनिवार्य असणार हा नियम

LIC च्या सर्व पॉलिसी होल्डर्ससाठी महत्त्वाची सूचना, आता अनिवार्य असणार हा नियम

देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीनं (LIC) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीनं (LIC) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार आता पॅन कार्ड (Pan Card) एलआयसी पॉलिसीशी जोडणे अनिवार्य आहे. एलआयसीने ट्विटवर  आणि आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. सरकारने पॅन आणि आधार जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. बाजार नियामक सेबीनेही गुंतवणूकदारांना याच मुदतीपर्यंत पॅन आधारशी जोडण्यास सांगितले आहे, त्याचप्रमाणे एलआयसीनेही हीच मुदत देत ग्राहकांना आपले पॅन पॉलिसीशी जोडण्याची सूचना दिली आहे. पॉलिसी पॅनशी जोडण्याची (Policy -Pan Linking Process) प्रक्रिया अत्यंत सोपी असून तुम्ही घरबसल्या ती ऑनलाइन करू शकता. यासाठी खालील टप्पे आहेत. - सर्वांत प्रथम एलआयसीच्या वेबसाइटवर (LIC Website) जाऊन पॉलिसींच्या यादीसह (List of Policies) पॅनची (Pan card Details) माहिती द्या. हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या प्रति तोळाचा दर - नंतर तुमचा मोबाईल नंबर (Mobile Number) टाका. त्या मोबाइल नंबरवर एलआयसीकडून एक ओटीपी (OTP येईल, तो भरा. - हा फॉर्म सबमिट (Submit) करा. त्यानंतर तुम्हाला नोंदणी पूर्ण झाल्याचा मेसेज दिसेल. - तुमचे पॅन पॉलिसीशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अन्य सुविधा >> घरबसल्या जाणून घ्या पॉलिसीची स्थिती- तुम्हाला तुमच्या एलआयसी पॉलिसीची स्थिती (Policy Status) घरबसल्या जाणून घेता येते. याकरता तुम्हाला आधी https://www.licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर इथं जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक (Policy Number) टाकून नोंदणी (Registration) करावी लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागत नाही. एकदा नोंदणी केल्यानंतर, केव्हाही तुम्ही तुमच्या पॉलिसीची स्थिती तपासू शकता. >> तसंच काही माहिती हवी असल्यास तुम्ही 022 -6827 6827 वर कॉल करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP <policy number> लिहून मेसेज पाठवू शकता. मेसेज पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत. हे वाचा-Petrol Price Today: 18व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, मुंबई-पुण्यात पेट्रोल >> त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाइलवरून एसएमएस (SMS) पाठवून पॉलिसीच्या स्थितीबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 56677वर एसएमएस पाठवावा लागेल. तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही ASKLIC PREMIUM असे टाइप करून 56677 या क्रमांकावर SMS पाठवू शकता. पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी ASKLIC REVIVAL टाइप करून SMS पाठवावा लागेल. >> एलआयसीच्या या सगळ्या ऑनलाइन सेवांमुळे ग्राहकांना घरबसल्या अनेक कामे करणे सहज शक्य झाले आहे. सध्याच्या काळात तर या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
First published: