डोंबिवली हादरली, रेल्वे ग्राऊंडजवळ सुटकेसमध्ये सापडला पुरुषाचा मृतदेह

डोंबिवली हादरली, रेल्वे ग्राऊंडजवळ सुटकेसमध्ये सापडला पुरुषाचा मृतदेह

डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ इथे रेल्वे ग्राऊंडच्या बाजूला एका बॅगेत मृतदेह सापडला आहे. भर दिवसा अशा प्रकार मृतदेह सापडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 06 फेब्रुवारी : डोंबिवलीमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ इथे रेल्वे ग्राऊंडच्या बाजूला एका बॅगेत मृतदेह सापडला आहे. भर दिवसा अशा प्रकार मृतदेह सापडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याआधीही मुंबईत अशा प्रकारे बॅगेत मृतदेह सापडल्याच्या घटना समोर आल्या आहे. डोंबिवलीतही ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सकाळीच्या सुमारास कामावर निघालेल्या स्थानिकांनी सुटकेस पाहिला आणि याची माहिती पोलिसांनी दिली. विष्णुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी सुटकेस ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटकेस उघडला असता त्यामध्ये एका पुरुषाचा मृतेदह असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सकाळच्या वेळी कोणीतरी मृतदेह रेल्वे ग्राऊंडच्याजवळ फेकला. या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यातही माहिम बीचवर सुटकेसमध्ये मृतदेह आढळला होता.

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची धमकी

माहिम सूटकेस हत्याकांडात मुंबई क्राईम ब्रांचने एक धक्कादायक खुलासा केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय बेनेट रिबेलो यांच्या हत्येमधील मुख्य आरोपी म्हणजे त्यांची मुलगी ही अल्पवयीन होती. तिचं वय 19 वर्ष असल्याचं सांगण्यात येत होतं पण ते ती 19 नसून अवघ्या 17 वर्षांची असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्डनुसार 21 जुलै 2002 रोजी तिचा जन्म झाला होता. त्यानुसार तिचे वय 17 वर्षे सहा महिने होते. रविवारी स्थानिक कोर्टाने पोलिसांना ते जुवेनाइल न्याय मंडळासमोर हजर करण्यास सांगितलं. तिचे वय निश्चित करण्यासाठी तिचे वैद्यकीय तपासणी करण्याचा विचार पोलीस करीत होते.

इतर बातम्या - कोरोनामुळे वाचली मुलीची इज्जत, बलात्कारासाठी रूममध्ये घुसला तरुण आणि...

मयत व्यक्तीच्या दत्तक मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले होते. प्रेमात अडथळा ठरल्याने मुलीने बापाचा काटा काढला. एवढेच नाही तर गुप्तांगासह अवयव कापून ते सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकल्याचे आरोपींनी कबूल केले होते. पोलिसांनी फेसबुक प्रोफाइल वरून मयत व्यक्तीची ओळख पटवली होती.

इतर बातम्या - तो पुन्हा आला! महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाला सुरुवात

First published: February 6, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या