Home /News /news /

प्रेमात उभं आयुष्य संपवलं, तरुण प्रेमी युगुलाने एकाच दोरीला लटकून केली आत्महत्या

प्रेमात उभं आयुष्य संपवलं, तरुण प्रेमी युगुलाने एकाच दोरीला लटकून केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बलवानिया गावची आहे. बलवण्यातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय लक्ष्मण अमलिया यांचे गावातील एका युवतीशी प्रेमसंबंध होते.

    डूंगरपूर, 02 फेब्रुवारी : प्रेम प्रकरणांमुळे सध्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर म्हणजे दोघांचे मृतदेह एकाच दोरीने झाडावर लटकलेले आढळले. या घटनेनंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर हत्येचा आरोप लावला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनाही लग्न करायचं होतं, पण कुटुंबीय त्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे दोघांनीही मृत्यूला मिठी मारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बलवानिया गावची आहे. बलवण्यातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय लक्ष्मण अमलिया यांचे गावातील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण एकच गोत्र असल्याने त्यांचे कुटुंबीय त्यासाठी तयार नव्हते. याच रागाच्या भरात शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मण आणि त्याची प्रेयसी घराबाहेर पडली. त्यानंतर शनिवारी दोघांचाही मृतदेह गावाच्या शाळेजवळील झाडावर एकाच दोरीने लटकलेला आढळला. मृतदेह पाहून गावात खळबळ उडाली आणि गावकरी मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. कुटुंबातील सदस्यांनी केला एकमेकांवर खुनाचा आरोप सरपंचांच्या माहितीवरून, धांबोला पोलीस ठाणे घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह झाडावरून खाली उतरवले. घटनास्थळी प्रियकर आणि प्रेयसीच्या नातेवाईकांनी एकमेकांवर खुनाचा आरोप केला. पोलिसांनी दोघांनाही प्रकरण समजावून सांगितले. यानंतर जिल्हा रुग्णालयात दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. लक्ष्मण मास्टर्सचा अभ्यास करत होता. त्याचवेळी त्याची प्रेयसी 12वीची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तरुणांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून यासंबंधी दोन्ही कुटुंबीयांची चौकशी करणार असून मृतांच्या शाळेत आणि कॉलेजमध्येही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या