मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोना विरुद्धच्या लढाईत होणार 'या' स्टेडियमचा वापर, सरकारपुढे प्रस्ताव सादर

कोरोना विरुद्धच्या लढाईत होणार 'या' स्टेडियमचा वापर, सरकारपुढे प्रस्ताव सादर

कोरोना (Covid-19) विरुद्ध देशभर सुरु असलेल्या लढाईत दिल्ली जिल्हा क्रिकेट संघानं (DDCA) देखील पुढाकार घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 16 मे : कोरोना (Covid-19) विरुद्ध देशभर सुरु असलेल्या लढाईत दिल्ली जिल्हा क्रिकेट संघानं (DDCA) देखील पुढाकार घेतला आहे. कोरोना संक्रमणाचा सामना करण्यासाठी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमचा (फिरोजशाह कोटला मैदान) उपयोग लसीकरण केंद्र आणि आयसोलेशन सेंटर यासाठी करावा असा प्रस्ताव संघटनेनं दिल्ली सरकारपुढं (Delhi Government) सादर केला आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी हा प्रस्ताव अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारपुढे सादर केल्याची माहिती संघटनेचे कोषाध्यक्ष शशी खन्ना यांनी दिली आहे.

डीडीसीएनं यापूर्वीच 100 ऑक्सिजन  कंन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) आणि व्हेंटीलेटर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. या नव्या निर्णयाबद्दल बोलताना खन्ना यांनी सांगितले की, ' या स्टेडियममध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत सूविधांसह पार्किंगची मोठी व्यवस्था आहे. त्याचबरोबर दिल्लीत मोठ्या लोकसंख्येला हे स्टेडियम जवळ आहे. याचा उपयोग लसीकरण किंवा आयसोलेशन सेंटरसाठी केला तर राजधानीतील मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा होईल.'

सोशल मीडियावरून कंगनाला सडेतोड उत्तर देणाऱ्या इरफान पठाणने केलं असं काम की सगळीकडून होतंय कौतुक

दिल्लीकरांना दिलासा

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत कोरोना संक्रमणाचे नवे 6430 रुग्ण आढळले, तर 337 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. या कालावधीमध्ये एकूण 11592 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीतील 56811 जणांची टेस्ट शनिवारी करण्यात आली. यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होऊन 11.32 टक्के झाले आहे.

First published:

Tags: Coronavirus, Delhi