S M L

IPL 2019 : घरच्या मैदानावर दिल्लीच ठरली 'किंग', पंजाबवर पाच विकेटनं विजय

श्रेयसनं 49 चेंडूत 58 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळं दिल्लीनं शेवटच्या षटकात सामना जिंकला.

Updated On: Apr 20, 2019 11:57 PM IST

IPL 2019 : घरच्या मैदानावर दिल्लीच ठरली 'किंग', पंजाबवर पाच विकेटनं विजय

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सध्या आयपीएलमध्ये सर्व संघांमध्ये प्ले ऑफकरिता चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात दिल्ली आणि पंजाब यांच्यात पहिल्या चारमध्ये कायम राहण्यासाठी चुरस दिसली. या सामन्यात दिल्लीनं पाच विकेट राखत विजय मिळवला.




दिल्लीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत पंजाबला 164 धावांवर रोखलं. तर, 164 धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली फलंदाजी केली. कर्णधारा श्रेयस अय्यरनं दिल्लीला आणखी विजय मिळवून दिली. श्रेयसनं 49 चेंडूत 58 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळं दिल्लीनं शेवटच्या षटकात सामना जिंकला.



Loading...

दरम्यान शिखर धवननं सलामीला आल्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. मात्र, 56 धावा करत बाद झाला. मात्र, शिखर आणि श्रेयस वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.



सलामीला आलेला पृथ्वी शॉला चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान तोही 13 धावांवर धावबाद झाला. शिखर आणि श्रेयसच्या अर्धशतकी भागीदारीनं दिल्लीला विजयाच्या जवळ नेले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही, खराब शॉट मारत तो बाद झाला. सध्या अंकतालिकेत दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे तर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

तर, प्रथम फलंदाजी करताना, पंजाबनं राहुल आणि मयंक अग्रवाल झटपट दोन विकेट गमवल्यानंतर, फलंदाजीची धुरा सांभाळली ती, ख्रिस गेलनं. ख्रिस गेलनं एकाकी झुंज देत आपली तुफानी फलंदाजी सुरु केली. केवळ 25 चेंडूत त्यानं आपलं शतक पुर्ण केलं. गेलंन 37 चेंडूत 69 धावा केल्या. तर, तळाला आलेल्या हरप्रीत सिंह आणि आर अश्विन यांनी शेवटच्या दोन आव्होरमध्ये 29 धावा केल्या. दिल्लीकडून संदिपनं 40 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, दिल्लीचा स्टार गोलंदाज रबाडानं 2 विकेट घेतल्या.



प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 20, 2019 07:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close