हाय अलर्ट, समुद्रामार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत पाकिस्तानी 'कमांडो'

हाय अलर्ट, समुद्रामार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत पाकिस्तानी 'कमांडो'

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून प्रशिक्षित कमांडो कांडला बंदरातून घुसखोरी करणार आहेत. गुप्तहेक यंत्रणेकडून ही माहिती मिळताच सर्व बंदरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाकिस्तान प्रशिक्षित एसएसजी कमांडो आणि दहशतवादी कच्छच्या खाडी भागात लहान नौका वापरून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या भागात चौकसी आणि गस्त वाढविण्यात आली आहे. गुजरातमधील कच्छच्या कांडला इथे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून प्रशिक्षित कमांडो कांडला बंदरातून घुसखोरी करणार आहेत. गुप्तहेक यंत्रणेकडून ही माहिती मिळताच सर्व बंदरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर हे कमांडो समुद्री मार्गाने घुसखोरी करू शकतात आणि गुजरातमध्ये मोठा हल्ला होऊ शकतो. नुकतंच भारतीय नौदलाने पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांनी समुद्रीमार्गे मोठ्या हल्ल्याच्या शोधात असल्याचा संशय व्यक्त केला होता. यासाठी जैश एका विंगला समुद्री हल्ल्याचे प्रशिक्षणही देत​आहे. तथापि, कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचं भारतील नौदलानं म्हटलं आहे.

भारतीय नौदलाचे (Indian Navy) प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांनी सोमवारी याबाबत अलर्ट जारी केला होता. ते म्हणाले की, 'गुप्तहेर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद आपल्या विंगला समुद्रीमार्गे हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. त्यावर आम्ही सगळे नजर ठेऊन. आम्ही तुम्हाला खात्री देतो की याविषयी आम्ही पूर्णपणे सावध आहोत.

अदानी पोर्ट्स आणि सेझ (SEZ) कडून निवेदन करण्यात आलं आहे की, 'कोस्ट गार्ड स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या जैश-ए-मोहम्मद हे दहशतवादी कच्छ जिल्ह्याजवळ भारत-पाक सीमेजवळ हारामी नाला खाडी परिसरात येणार आहेत. या कमांडो आणि दहशवाद्यांना अंडरवॉटर ट्रेनिंग दिली असल्याची माहिती आहे.'

इतर बातम्या -  मुंबईत 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 'निर्भया'चा मृत्यू; अखेर मृत्यूशी झुंज संपली!

यापूर्वीही 4 दहशतवाद्यांच्या घुसखोरीनंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या एजंटसह 4 दहशतवादी भारतात घुसले होते. त्यानंतर राजस्थान आणि गुजरात सीमेसह संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

इतर बातम्या - बालकनीत रेलिंग पकडून योगा करत होती तरुणी, 80 फूट खाली कोसळली!

युद्धाच्या तणावात पाकिस्तानने केली 'गजनवी' क्षेपणास्त्राची चाचणी!

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान भारताला सातत्यानं युद्धाचे इशारे देत आहे. गुरुवारी पाकिस्तानने त्यांच्या 'बॅलेस्टिक क्षेपणास्त्रा'ची यशस्वीरीत्या चाचणी केली. 'गजनवी' असं या क्षेपणास्त्राचं नाव आहे. गजनवी पृष्ठभागापासून 290 किलोमीटरपर्यंत मार करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र 700 किलो स्फोटकं घेऊन जाऊ शकतं. कराचीजवळील सोनमियानी फ्लाइट टेस्ट रेंजमध्ये याची चाचणी करण्यात आली. पाकिस्तानचे नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स (NDC) पंजाब (पाकिस्तान) मधील फतेहजंग इथे आहे. इथूनच क्षेपणास्त्रावर नजर ठेवली जाणार आहे.

इतर बातम्या - 'नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा बाप्पा' अशी जाहिरात करताना सावधान...!

'गजनवी'ची चाचणी घेण्यासाठी पाकिस्तानने पुढील 3 दिवस कराची हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्राचे 3 हवाई मार्ग बंद केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सतत भारताविरूद्ध मदत शोधत आहे. नेमकी अशाच वेळी 'गजनवी' या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. त्यामुळे पाक भारताला घाबरवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं. या सगळ्यात मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नाराज असल्याचं दिसून आलं. पण अशा परिस्थितीतही पाक युद्ध आणि आण्विक हल्ल्याची धमकी देत आहे.

VIDEO: शरद पवारांनी तुम्हाला वडिलांसारखी दिलेली वागणूक कुठेच मिळणार नाही’, शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल

Published by: Renuka Dhaybar
First published: August 29, 2019, 1:50 PM IST

ताज्या बातम्या