S M L

पाकिस्तानची मुजोरी कायम, शस्त्रसंधी मोडत पुन्हा गोळीबार

शस्त्रसंधी मोडत पाकिस्तानने पुन्हा गोळीबार करत मुजोरी कायम ठेवली आहे. अरनिया आणि आरएस पुरा विभागात पाकिस्तानी रेंजर्सनी आज सकाळी भारतीय ठिकाणांवर गोळीबार केला.

Ajay Kautikwar | Updated On: May 21, 2018 12:06 PM IST

पाकिस्तानची मुजोरी कायम, शस्त्रसंधी मोडत पुन्हा गोळीबार

जम्मू,ता. 21 मे : शस्त्रसंधी मोडत पाकिस्तानने पुन्हा गोळीबार करत मुजोरी कायम ठेवली आहे. अरनिया आणि आरएस पुरा विभागात पाकिस्तानी रेंजर्सनी आज सकाळी भारतीय ठिकाणांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे.

या गोळीबारामुळं सीमारेषच्या पाच किलोमीटर परिसरातल्या शाळा सोमवारी बंद ठेवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळं पाकिस्तानकडून भारताला गोळीबार थांबवण्याची विनंतीही करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याचं दिवशी पुन्हा गोळीबार केल्यानं पाकिस्तानची दुटप्पी वृत्ती पुन्हा एकदा समोर आलीय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 12:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close