दाऊदच्या घराचा पुन्हा लिलाव

दाऊदच्या घराचा पुन्हा लिलाव

दाऊद इब्राहिमच्या घराचा इ-लिलाव होणार आहे. म्हणजे घरबसल्या तुम्ही दाऊदच्या घरासाठी बोली लावू शकता. याची राखीव किंमत आहे 1 कोटी 55 लाख 76 हजार. म्हणजे यापेक्षा कमी किमतीत हे घर घेता येणार नाही. आणि दाऊदचं हॉटेल घ्यायचं असेल तर तुम्हाला मोजावे लागणार आहेत 1 कोटी 18 लाख 63 हजार.

  • Share this:

मुंबई ,18 ऑक्टोबर: दाऊद इब्राहिमचं मुंबईतलं घर तुम्हाला विकत घेता येणार आहे. हो, खरंच तसं करता येणार आहे. कारण सरकारनं दाऊदच्या मुंबईच्या घराची रीतसर जाहिरातच दिलीय.

दाऊद इब्राहिमच्या घराचा इ-लिलाव होणार आहे. म्हणजे घरबसल्या तुम्ही दाऊदच्या घरासाठी बोली लावू शकता. याची राखीव किंमत आहे 1 कोटी 55 लाख 76 हजार. म्हणजे यापेक्षा कमी किमतीत हे घर घेता येणार नाही. आणि दाऊदचं हॉटेल घ्यायचं असेल तर तुम्हाला मोजावे लागणार आहेत 1 कोटी 18 लाख 63 हजार. दक्षिण मुंबईच्या भेंडी बाजार भागात पाकमोडिया स्ट्रीट नावाचा भाग आहे. तिथे दाऊदचं हे घर आहे. याचा ई-लिलाव होणार आहे. बोली लावण्यासाठी शेवटची तारिख आहे 14 नोव्हेंबर.

याआधी पण दाऊदच्या घराचा लिलाव करण्यात आला होता.पण त्यावेळी कोणीही हे घरं विकत घ्यायची हिंमत केली नव्हती. त्यामुळे दाऊदचं घर आता कोण विकत घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published: October 18, 2017, 5:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading