सतत रडते म्हणून दारुड्या बापानेच आवळला एक वर्षाच्या चिमुरडीचा गळा

लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील संतापजनक घटना घडली आहे.मुलगी सतत रडते म्हणून दारुड्या बापानेच गळा आवळून तिचा खून केल्याची घटना निटूर या गावात घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 10:47 PM IST

सतत रडते म्हणून दारुड्या बापानेच आवळला एक वर्षाच्या चिमुरडीचा गळा

लातूर, 3 ऑगस्ट- लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील संतापजनक घटना घडली आहे.मुलगी सतत रडते म्हणून दारुड्या बापानेच गळा आवळून तिचा खून केल्याची घटना निटूर या गावात घडली आहे. शिवाजी लाळे असे निर्दयी बापाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील निटूर गावातील रहिवाशी असलेला शिवाजी लाळे याने आपल्या एक वर्षीय श्रावणी नावाच्या मुलीला गळा आवळून खून केला आहे. श्रावणी खूप रडते म्हणून निर्दयी बापाने हे कृत्य केले आहे. शिवाजी लाळे हा गुरुवारी (1 ऑगस्ट) सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. श्रावणी तिच्या आईजवळ (मुक्ता) होती. ती सारखी रडत होती. श्रावणीला झोपवतो असे सांगून शिवाजीने तिला घेतले आणि तिचा गळा आवळून तिला ठार मारले. श्रावणीचा आवाज कसा येत नाही, हे पाहण्यासाठी मुक्ता तिच्याजवळ गेली. मात्र, तिची काहीच हालचाल होत नसल्याने ती घाबरली. तिने तातडीने रुग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी चिमुकल्या श्रावणीला मृत घोषित केले. मृत श्रावणीला घेऊन मुक्ताने पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी शिवाजी लाळे या निर्दयी बापाला अटक केली.

आरोपी शिवाजी लाळे हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. शिवाजीच्या पहिल्या पत्नीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मुक्ता यांच्याशी त्याचे दुसरे लग्न झाले. हॉटेलच्या व्यवसायातून नफा मिळत नसल्याने दारूच्या आहारी गेलेल्या शिवाजीने हे क्रूर कृत्य केले.

VIDEO - ... म्हणून मुंबईला आली 26 जुलैची आठवण, मिठीने ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2019 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...