मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Spicejet च्या 12 लाख प्रवाशांचा डेटा लीक, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींनी खळबळ

Spicejet च्या 12 लाख प्रवाशांचा डेटा लीक, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींनी खळबळ

SBI कार्ड असणाऱ्यांना 10 टक्के सूट आहे. आॅफर www.spicejet.com यावर उपलब्ध आहे.

SBI कार्ड असणाऱ्यांना 10 टक्के सूट आहे. आॅफर www.spicejet.com यावर उपलब्ध आहे.

डेटा बॅकअप फाईलमध्ये साठवला होता. तो सुरक्षित केलेला नव्हता. या कारणानं 12 लाख प्रवाशांची माहिती हॅक झाली.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 31 जानेवारी: स्पाईस जेट (Spicejet)  या खासगी विमान कंपनीच्या 12 लाख प्रवाशांचा डेटा लीक झाल्याच्या बातमीवर कंपनीनं शिक्कामोर्तब केलं आहे. एका सुरक्षा संशोधकाने विमान कंपनीच्या व्यवस्थापनातील सुरक्षेच्या त्रूटी दाखवून दिल्यानंतर कंपनीनं ही कबुली दिली आहे.

टेक क्रंच या वेबसाईटच्या माहितीनुसार सुरक्षा संशोधकानं आपल्या कृतीला 'इथिकल हॅकिंग' असं सांगत एका सोप्या पासवर्डच्या मदतीनं विमान कंपनीच्या सिस्टमला हॅक करून दाखवलंय. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. कंपनीनं प्रवाशांचा डेटा एका बॅकअप फाईलमध्ये साठवला होता. तो सुरक्षित केलेला नव्हता. त्यामुळे 12 लाख प्रवाशांची माहिती सहजासहजी हॅक करता आली. यात फ्लाईटची माहिती, प्रवाशाचं नाव, फोन नंबर, ईमेल एड्रेस आणि जन्मतारखेची माहिती होती.

सुरक्षा संशोधकानं स्पाईसजेटचा डेटा लीक झाल्याची माहिती जाहीर करताच कंपनीच्या सुरक्षेव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. स्पाईसजेटला माहिती दिल्यानंतर सुरक्षा संशोधकानं भारताच्या सायबर क्राईम हाताळणाऱ्या CERT-In या सरकारी यंत्रणेलाही कळवलं. CERT-In नेही हे मान्य केलंय की सुरक्षा व्यवस्थेत चूक राहिल्यानं डेटा लीक झालेला आहे. त्यानंतर लगेचच CERT-In  ने स्पाईसजेटला याबद्दलची माहिती दिली. सगळा प्रकार समोर आल्यानंतर स्पाईसजेटमध्ये एकच खळबळ उडाली आणि त्यांनी तातडीनं सुरक्षेच्या संदर्भात आणखी पावलं उचलायला सुरुवात केली.

First published:

Tags: Data hackers, Data leak, Data privacy, Spicejet news