'दशक्रिया' चित्रपटाचे शोज राज्यभर सुरू, पैठणमध्येही 'दहावा बंद' आंदोलन मागे !

दशक्रिया या चित्रपटाच्या विरोधात पैठणमधील ब्राह्मण महासंघाने सुरू केलेलं 'दहावा बंद' आंदोलन आता मागे घेण्यात आलंय. तसंच चित्रपटाचा शो देखील अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सुरू झालाय. पैठणच्या पुरोहित महासंघाने औरंगाबाद हायकोर्टात दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टाच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावल्याने पैठणमधील पुरोहित महासंघाने दशक्रिया विधी बंदचं आंदोलनही मागे घेतलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2017 02:03 PM IST

'दशक्रिया' चित्रपटाचे शोज राज्यभर सुरू, पैठणमध्येही 'दहावा बंद' आंदोलन मागे !

17 नोव्हेंबर, औरंगाबाद : दशक्रिया या चित्रपटाच्या विरोधात पैठणमधील ब्राह्मण महासंघाने सुरू केलेलं 'दहावा बंद' आंदोलन आता मागे घेण्यात आलंय. तसंच चित्रपटाचा शो देखील अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सुरू झालाय. पैठणच्या पुरोहित महासंघाने औरंगाबाद हायकोर्टात दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टाच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावल्याने पैठणमधील पुरोहित महासंघाने दशक्रिया विधी बंदचं आंदोलनही मागे घेतलंय. पण चित्रपटाविरोधातली निदर्शनं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं पुरोहित महासंघाने म्हटलंय.

आज सकाळी राज्यात ठिकठिकाणी ब्राह्मण महासंघाने दशक्रिया चित्रपटाविरोधात थिएटरबाहेर निदर्शनं करून त्याचे शोज् बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण संभाजी ब्रिगेडने सिनेमाच्या समर्थनार्थ या वादात उडी घेतल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात राज्यात ठिकठिकाणी चित्रपटाचे शोज् पुन्हा सुरू झालेत. पिंपरीमध्येही पोलीस संरक्षणात दशक्रिया चित्रपटाचा शो पुन्हा सुरू झालाय. पुण्यातही या चित्रपटाचे शोज् सुरळीतपणे सुरू आहेत.

दशक्रिया या चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. पण हायकोर्टानं सिनेमावर बंदी घालण्यास नकार दिल्याने किरकोळ निदर्शनं वगळता राज्यभर या चित्रपटाचे शोज सुरळीतपणे सुरूच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...