चहाच्या टपरीवर सुरू होत्या निवडणुकांच्या गप्पा, गोळीबार करून क्षणात दोघांची हत्या

चहाच्या टपरीवर सुरू होत्या निवडणुकांच्या गप्पा, गोळीबार करून क्षणात दोघांची हत्या

परिसरात गोळीबार होताच धावपळ सुरू झाली. घटना घडताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला.

  • Share this:

बिहार, 18 एप्रिल : निवडणुका म्हटलं की पोलिसांचा ताफा आणि कडक सुरक्षा आलीच. पण दरभंगा पोलिसांच्या सुरक्षेची पोलखोल होईल असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरभंगामध्ये निवडणुकीदरम्यान, पोलीस सुरक्षा इतकी नरमली होती की एका इसमाने भरदिवसात मतदान केंद्रात 3 लोकांवर गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना दरभंगाच्या तारालाही गावामध्ये घडली आहे. जिथे आरोपींनी 3 लोकांवर गोळीबार केला. या घटनेमध्ये परीक्षण यादव आणि वैजू यादव अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर राजकुमार यादव हे यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना अधिक उपचारासाठी पटनामधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री भलतेच आक्रमक, म्हणाले...!

परिसरात गोळीबार होताच धावपळ सुरू झाली. घटना घडताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर दरभंगाच्या सिटी एसपी योगेंद्र कुमार यांनी जखमीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

गोळीबाराचा हा संपूर्ण प्रकार जमिनीच्या वादातून घडला असल्याचं योगेंद्र कुमार यांनी सांगितलं. या हत्येमागं अनेक संशयितांची नावं समोर आली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून या हत्येचा कसून तपास सुरू आहे.

'निवडणुका असल्यामुळे चहाच्या टपरीवर आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्यावेळी अचानक 4-5 लोक दुचाकीवर आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन लोकांना गोळी लागली. ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.' अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणात सगळ्यांची चौकशी करत आहेत.


हीच 'ती' सुप्रिया सुळेंची व्हायरल झालेली AUDIO क्लिप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bihar News
First Published: Apr 18, 2019 09:57 AM IST

ताज्या बातम्या