शामक दावरने सांगितले डान्स करण्याचे फायदे

स्वतःला शोधण्यासाठी आणि व्यक्तिमत्वात सकारात्मकता येण्यासाठी अनेकजण डान्सकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 01:49 PM IST

शामक दावरने सांगितले डान्स करण्याचे फायदे

मनोसोक्त नाचल्यामुळे फक्त व्यायामच होतो असं नाही तर मनावरचा ताणही कमी होतो शिवाय मन सदैव आनंदी राहायला मदत होते. त्यामुळे सध्या अनेकजण डान्सचे वेगवेगळे फॉर्म शिकताना दिसतात. स्वतःला शोधण्यासाठी आणि व्यक्तिमत्वात सकारात्मकता येण्यासाठी अनेकजण डान्सकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत.

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक आपला जास्तीत जास्तवेळ सोशल मीडिया, व्हिडीओ गेम यांच्यामध्येच वाया घालवतात. पण जर तुम्ही एखादा डान्स फॉर्म शिकलात तर निरोगी राहायला तर मदत होतेच शिवाय आत्मविश्वास वाढणं, लक्ष केंद्रीत करायला मदत होणं, एकाग्रता, टीम म्हणून काम करणं, शिस्त, शरीराची रचना या प्रत्येक गोष्टी सुधारण्यास मदत होते.

डान्स शिकताना निसर्गाशी एकरूप होता येतं त्यामुळे मनंही प्रसन्न राहायला मदत होते. रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होतं. तसंच मांसपेशी मजबूत होतात आणि वजन नियंत्रीत राखण्यास मदत होते.

Loading...

एवढंच नाही तर चांगलं संभाषण आणि कौशल्य विकसीत व्हायला मदत होते. नृत्यामुळे शरीरातील घाम बाहे पडायला मदत होते त्यामुळे एण्डॉर्फिन हा घटक शरीरातून बाहेर पडायला मदत होते. याचा फायदा आनंदी राहाण्यास होतो.

चांगल्या संगीतामुळेही मन प्रसन्न राहायला मदत होते. त्यामुळे संगीत आणि डान्स यांची सांगड घालून तुम्ही डान्सचे क्षण अक्षरशः जगू शकतात.

डान्स संपूर्ण फिटनेस, सहनशक्ती आणि स्नायूंना बळकट करण्याचं काम करतं. तसंच ग्रुपमध्ये एकत्रितपणे काम केल्याने टीमचं महत्व तसंच टीम बॉण्डिंग वाढायला मदत होते. नृत्यासाठी भरपूर सहनशक्ती आवश्यक असते जी शरीर चपळ करण्यास मदत करते. अशा प्रकारे डान्समधून मनःशांती, एकाग्रता, चपळता, तंदुरुस्ती आणि निरोगी राहण्यास मदत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2019 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...