News18 Lokmat

मुलाने पळून लग्न केलं म्हणून दलित महिलेच्या घराला लावली आग

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत कवाडगव्हान गावातील एका इसमाने एका गरीब दलित महिलेच्या घराला आग लावली.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2018 03:02 PM IST

मुलाने पळून लग्न केलं म्हणून दलित महिलेच्या घराला लावली आग

संजय शेंडे, प्रतिनीधी

अमरावती, 18 ऑगस्ट : अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत कवाडगव्हान गावातील एका इसमाने एका गरीब दलित महिलेच्या घराला आग लावली. ही आग इतकी भयंकर होती की, महिलेचे घर पूर्णपणे जळून खाक झाले.  या प्रकरणी तिवसा पोलिसांनी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बेबी लक्ष्मण मेंढे वय४९ रा. कवाडगव्हान असे फिर्यादी दलित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी गणेश काळे रा.कव्हाडव्हान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला अनेक वर्षांपासून गावात राहते. ती गावातीलच अंगनवाडी मदतनीस म्हणून काम पाहते. तिच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी कव्हाडगव्हान स्थानिक ग्रामपंचायतने तिला मदतनीस म्हणून काढून टाकण्याचा ठराव तयार केला असल्याचे दलित महिलेने सांगितले आहे.

Controversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू

काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या मुलाने गावातील मुलीला प्रेम प्रकरणात पळून नेले होते. याचाच वचपा म्हणून गावातील एका इसमाने रात्री या दलित महिलेचे घर पेटून दिले. यात घरातील उपयोगी वस्तू, धान्य जळून खाक झाले.

Loading...

पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गणेश चपंत काळे यांचे विरुद्ध भादवी ४३६नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Viral Photo: 'देसी गर्ल'च्या विदेशी सासू- सासऱ्यांना पाहिले का?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2018 03:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...