• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राशीभविष्य: या राशीने आज ऐकायला हवा जोडीदाराचा सल्ला

राशीभविष्य: या राशीने आज ऐकायला हवा जोडीदाराचा सल्ला

आज गुरुवार दिनांक 5 जुलै 2021 तिथी आषाढ कृष्ण द्वादशी. जोडीदाराचा सल्ला ऐका आणि जोडीदाराकडून फार अपेक्षा करू नका असा सल्ला दोन राशींसाठी देण्यात आला आहे. वाचा तुमचं राशीभविष्य..

  • Share this:
आज गुरुवार दिनांक 5 जुलै 2021 तिथी  आषाढ कृष्ण द्वादशी. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष व्यवसाय  वाढीस लागेल. महत्त्वाचा फोन येऊन चर्चा होईल. कौटुंबिक सुख लाभेल. थोडे  मानसिक द्वंद्व चालू राहील. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस उत्तम आहे. वृषभ घरा संबंधी महत्त्वाचा  आठवडा आहे. काही तरी निर्णय होईल.भावंडांची प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतात. गुरु कृपा  कामात मदत करेल. दिवस चांगला जाईल. मिथुन राशीतील  चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे.दिवस शुभ व  आनंदी आहे. थोडा खर्च होईल. पण कुटुंब त्यामुळे खुश राहील. अष्टम शनि फक्त जपून राहण्याचा संकेत देतो आहे. दिवस शुभ कर्क आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. राशीतील रवि आता पुढच्या राशीत जाण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचा निर्णय  सरकारी कामे उरकून घ्या. दिवस मध्यम  जाईल . सिंह आज दिवस  झपाट्याने कामे मार्गी लावण्यास मदत करेल. राशीतील मंगळ  ऊर्जा आणि तेज निर्माण करेल. जे चांगल्या कामासाठी वापरले तर फायदा होईल. प्रभावशाली दिवस. कन्या दशमातील चंद्र आज  कार्य क्षेत्रात काही महत्त्वाचा बदल घडवून आणेल. रखडलेले काम ताबडतोब मार्गी लागेल.  घरातले सगळे मदत करतील. दिवस  शुभ आहे. तुला आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती दाखवत आहे. काही प्रवास, भेटी आणि धार्मिक कार्य संभवतात. थोडी दगदग होईल. पण दिवस चांगला जाईल. वृश्चिक शारीरिक दुखणी विशेष करून अंग दुखी त्रास देईल. मन थोडे  उद्विग्न राहील. पण शांत रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा नको. दिवस  मध्यम  आहे. धनु आज काहींना मौजमजेसाठी वेळ काढावा असे वाटेल. जोडीदार मदत करेल. त्यांच्या  सोबत वेळ घालवा. आरोग्य मात्र सांभाळून रहा. दिवस शुभ. मकर आज नवीन लोक भेटतील. बौद्धिक पातळीवर तुम्ही चमकून  जाल. वाहन अगदी जपून चालवा. एकट्याने प्रवास करणे टाळा. जोडीदाराचा योग्य सल्ला ऐका. दिवस चांगला जाईल. कुंभ आज संतती सुख भरपूर लाभेल. मुलं मनासारखी वागतील. शत्रू तुम्हाला घाबरून राहतील. मंगळाचा जप करावा. जोडीदाराला  जपावे. वाद नको. दिवस शुभ. मीन आज तुम्हाला दिवस निवांत आणि फार दगदग ना करता घालवायचा आहे. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. संतती चिंता थोडी कमी होईल. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
First published: