डहाणूच्या समुद्रात शाळकरी मुलांची बोट बुडाली, 2 जणांचा मृत्यू

डहाणूच्या समुद्रात शाळकरी मुलांची बोट बुडाली, 2 जणांचा मृत्यू

डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर शाळकरी मुलांची बोट उलटली होती, बोटीमधल्या 32 मुलांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय. उर्वरित 8 मुलांचा शोध सुरू आहे.

  • Share this:

13 जानेवारी, डहाणू : डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर शाळकरी मुलांची बोट उलटली. या दुर्घटनेत  32 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं, मात्र 2 जणांचा बुडून मृत्यू झाला. तर 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता विद्यार्थ्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

केएल पोंदा हायस्कूलची ही सर्व मुलं असून ती पिकनिकसाठी समुद्र किनारी आली होती. पण त्यांची बोट समुद्रात उलट्याने सर्व मुलं पाण्यात बुडाली. त्यातल्या बऱ्याच मुलांना पोहता येत असल्याने अनेकांना वाचवण्यात यश आलंय. आतापर्यंत 32 मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. जखमी मुलांना डहाणू कॉटेज हॉस्पिटलमधे दाखल केलं. तर बेपत्ता मुलांचा डहाणू पोलीस आणि कोस्टल गार्ड शोध घेत आहेत.

First published: January 13, 2018, 3:52 PM IST

ताज्या बातम्या