डहाणूची बेपत्ता झालेली बोट सापडली, 20 मच्छिमार सुरक्षित

डहाणूची बेपत्ता झालेली बोट सापडली, 20 मच्छिमार सुरक्षित

डहाणूच्या समुद्रात बेपत्ता झालेली मच्छिमारांची बोट अखेर गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आलीय. डहाणूचे कोस्टगार्ड कमांडिग ऑफिसर विजयकुमार यांनी ही माहिती दिली. ही बोट गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती

  • Share this:

डहाणू, 31 ऑगस्ट : डहाणूच्या समुद्रात बेपत्ता झालेली मच्छिमारांची बोट अखेर गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आलीय. डहाणूचे कोस्टगार्ड कमांडिग ऑफिसर विजयकुमार यांनी ही माहिती दिली. ही बोट गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. डहाणू इथं काल 40 ते 50 मैलावर मच्छीमारी करत असताना रामप्रसाद या बोटमधले 10 खलाशी बुडाल्याची घटना घडली होती. पण त्याच परिसरात असणाऱ्या प्रेमप्रसाद बोटमधल्या खलाशांना या सर्वांना वाचवलं पण कालपासून ही प्रेमप्रसादबी बेपत्ता झाली होती. या बोटीत वाचवलेले 10 मच्छिमार आणि मूळ बोटीवरचे असे एकूण 20 मच्छिमार होते.

हे सर्वजण बुडाल्याची भीती व्यक्त होत होती. पण सुदैवाने हे सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळालीय. हे सर्वजण गुजरातच्या नहाबंदी बेटावर असून लवकरच त्यांना डहाणूकडे आणलं जाईल, असंही कोस्टगार्डने सांगितलंय.

First published: August 31, 2017, 3:55 PM IST

ताज्या बातम्या