बॉयफ्रेंडची केली निर्घृण हत्या, त्यानंतर वडिलांनी लेकीशी केलं लग्न

बॉयफ्रेंडची केली निर्घृण हत्या, त्यानंतर वडिलांनी लेकीशी केलं लग्न

प्रियकराच्या हत्येनंतर 3 आठवड्यांनंतर वडिलांनी मुलीशी लग्न केले. अलीकडेच कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हे प्रकरण उघडकीस आले आहे.

  • Share this:

अमेरिका, 19 नोव्हेंबर : 55 वर्षांच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रियकराची हत्या केली आणि त्यानंतर तिच्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियाची आहे. प्रियकराच्या हत्येनंतर 3 आठवड्यांनंतर वडिलांनी मुलीशी लग्न केले. अलीकडेच कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हे प्रकरण उघडकीस आले आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार, वडील लॅरी पॉल मॅकक्ल्यूर याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपूर्वी 38 वर्षीय टॉमस मॅकक्लूअर 31 वर्षीय मुलगी अमंडला डेट करत होता. अमंड आणि तिच्या बहिणीवरही प्रियकरची हत्या केल्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी वडील आणि दोन मुलींना अटक केली आहे. मॅकक्ल्यूरला त्याच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याला इंजेक्शन देण्यात आले आणि त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना फेब्रुवारी 2019 मध्ये घडली.

इतर बातम्या - जिगरी दोस्तावर राग होता पण तरी त्याच्यासोबत पार्टी केली आणि नंतर कायमचं संपवलं!

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या फ्लॅटमध्ये ही हत्या झाली, तेथे वडील-मुलगी राहू लागली आणि दोघांनी लग्न केले. आरोपी वडिलांची चौकशी करून पोलिसांनी मॅकक्ल्यूरचा मृतदेह ताब्यात घेतला होता.

आरोपी वडिलांनी स्वत: पोलिसांना सांगितले की, या दोन मुलींनीही या हत्येस मदत केले. नुकतीच स्थानिक न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी सांगितले की या हत्येमध्ये तीन जणांचा सहभाग होता. तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी - शिवसेना आणि भाजपमध्ये सगळं काही संपलं नाही, दिवाकर रावतेंनी दिले संकेत

Published by: Renuka Dhaybar
First published: November 19, 2019, 10:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading