Home /News /news /

ड जीवनसत्त्व: आत्ताच्या घडीला यावर बोलणे का महत्त्वाचे आहे?

ड जीवनसत्त्व: आत्ताच्या घडीला यावर बोलणे का महत्त्वाचे आहे?

उन्हात फार वेळ न राहणाऱ्या व्यक्ती या ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेला बळी पडतात.

  ड जीवनसत्त्व हे हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी सहाय्यक असल्याचे सर्वांना माहिती आहे. पण दिवसेंदिवस घटत चाललेले शारीरिक कार्य पाहता, जीवनातील कार्यक्षमता सांभाळण्यासाठी ड जीवनसत्त्वाचे महत्त्व वाढले आहे. मला वाटते की, ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेशी संबंधित विविध आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून, मी आतापर्यंतच्या माझ्या कारकीर्दीत हाडांच्या/ स्नायूंच्या दुखण्याने व थकव्याने ग्रस्त रुग्णांचे निकृष्ट आरोग्य पाहिले आहे. आरोग्यातील या बिघाडांमागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे ड जीवनसत्त्वाचा अभाव. म्हणूनच एखाद्याचा ड जीवनसत्त्वाचा वापर आणि कमतरतेची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला वाटते, आपल्यासमोरील आरोग्याविषयक विविध समस्यांवर विचार करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आपल्या कामाच्या सवयी जशा बदलल्या तसतशा आधीपासूनच असलेल्या अन्य समस्याही बळावत गेल्या. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काम करताना गेल्या काही महिन्यांत जे बैठे काम करण्यात जास्त व्यतीत झाले त्यात हाडांच्या/ स्नायूंच्या दुखण्याने व थकव्याने ग्रस्त रुग्णांचे निकृष्ट आरोग्य पाहिले आहे. आरोग्यातील या बिघाडांमागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे ड जीवनसत्त्वाचा अभाव. म्हणूनच एखाद्याच्या ड जीवनसत्त्वाचा वापर आणि कमतरतेची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगभरातील जवळपास ५०% लोकसंख्या ड जीवनसत्त्वाच्या अभावाचा सामना करते आहे. अलीकडच्या माहितीनुसार ७६% भारतीयांमध्ये ड जीवनसत्त्वाचा अभाव आहे. या अभ्यासाने हेही स्पष्ट केले आहे की, १८ ते ३० वर्षे वयोगटातील भारतीयांमध्ये हे कमतरतेचे प्रमाण जास्त आहे. ज्याचे देशाच्या सर्वच भागांमध्ये सारखेच प्रमाण आहे. हाडांचा ठिसूळपणा आणि स्नायूंमधील अशक्तपणा यांच्याशी ड जीवनसत्त्व निगडीत आहे. त्यामुळे ऑस्टीओमॅलेसिया( हाडांचा ठिसूळपणा), ऑस्टीओपेनिया आणि ऑस्टीओपोरोसिस असे हाडांचे विकार आणि फ्रॅक्चर यांचा धोका वाढतो. नुकतेच झालेले एक संशोधन हृदयविकार, टाईप-२ मधुमेह, फ्रॅक्चर्स व फॉल्स, नैराश्य, कर्करोग यांच्या विरोधातील आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने ड जीवनसत्त्वाचे महत्त्व असण्याला पुष्टी देते. पण या लक्षणांचा विचार करता, ड जीवनसत्त्वासारख्याच एखाद्या आवश्यक पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या विविध समस्यांवर कसा परिणाम होतो याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. अशा समस्या टाळण्यासाठी मी माझ्या रुग्णांना चांगल्या आरोग्याच्या मूलतत्त्वांची काळजी घेण्यास सांगतो. ड जीवनसत्त्वाचे स्त्रोत खरे तर, प्रौढांमध्ये 30ng/mL इतके ड जीवनसत्त्व सांभाळून त्याची पुरेशी पातळी राखणे गरजेचे आहे. ड जीवनसत्त्वाचा एक सक्षम स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश, जो शरीरातील ड जीवनसत्त्व त्वचेमध्ये साठवण्यास मदत करतो. केवळ काहीच अन्नपदार्थ सातत्याने रोज ड जीवनसत्त्व पुरवू शकतात; जसे की, साल्मोन आणि ट्युनासारखे बहुतांश मासे फिश लिव्हर ऑईल्स, चीज आणि अंड्याचा बलक. मुलांसाठी अंडी हा ड जीवनसत्त्वाचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. त्याच्याच बरोबरीने सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत दिवसातून दोनदा सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यानेही तुमची ड जीवनसत्त्वाची दैनंदिन गरज भागेल. मी माझ्या रुग्णांना यातील कोणता स्त्रोत त्यांच्यासाठी सहज उपलब्ध होतो याचा विचार करून त्याद्वारे दररोज ड जीवनसत्त्व घेण्याचा सल्ला देतो. जर त्यात कमतरता असेल तर ड जीवनसत्त्वाचे सप्लीमेंट्स देऊन ती भरून काढता येईल. ड जीवनसत्त्वाची कमतरता कशामुळे निर्माण होते? उन्हात फार वेळ न राहणाऱ्या व्यक्ती या ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेला बळी पडतात. घराबाहेर व्यतीत केलेल्या वेळेव्यतिरिक्त ऊन अगदी सौम्य असेल तर किंवा 30 पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरणे अशा अनेक कारणांमुळे हे होऊ शकते. तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्त्व निर्माण करण्यामध्ये तुमच्या त्वचेचा रंगसुद्धा बाहेर वेळ व्यतीत करण्याच्या तुमच्या गरजेमध्ये योगदान देतो. स्थूलता ही व्हीडीडीशी निगडीत असते. सामान्यतः बरियाट्रीक पेशंट्स आणि मॅलाब्सोर्प्शन ज्यामध्ये लहान आतडे पोषाणमूल्ये शोषून घेऊ शकत नाही, कारण त्यांच्या आहारातील ड जीवनसत्त्व शोषून घेण्याची क्षमता कमी झालेली असते. पुढे, अर्थातच वयोमानासारख्या स्वाभाविक कारणांमुळे एखाद्याच्या शरीरातील ड जीवनसत्त्व शोषण्याची क्षमता कमी होते. पण हे एकत्रित परिणाम वेळेवर उपचार करून रोखता येतात. आपण कमतरतेसाठी सप्लीमेंट घेताना ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावे का? डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेण्यासाठीच्या सप्लीमेंटचे भारतात खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. सेवन करण्यासाठी तयार असलेल्या प्रकारांत चांगले ग्रहण होण्यासाठी चरबीयुक्त पदार्थांसोबत घेण्यासाठी गोळ्या/ टॅबलेट्स/ कॅप्सूल्स व नॅनोलिक्विड पर्याय उपलब्ध आहेत. ड जीवनसत्त्वाच्या नॅनोपार्टीकल फॉर्म्युलेशन्सच्या अभ्यासातून रुग्णाच्या जीविताच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणेसह लिक्विड फॉर्म्युलेशनची चांगली परिणामकारकता दिसून आली आहे. तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी काय जास्त योग्य ठरेल हे ठरवतील. डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी अनेक संबंधितांना संबोधित करण्यासाठी तसेच ड जीवनसत्त्वाचा अभाव आणि वयोमानानुसार नवजात बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत विविध प्रकारच्या पेशंट्ससाठीच्या त्याच्या गरजेविषयी सजगता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. Abbott ची ‘डी स्ट्राँग, अॅक्टीव्ह लाईफ’ मोहीम आपल्या देशाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आरोग्यविषयक समस्येविषयी संबोधन करते. अधिक माहितीसाठी येथे येथे क्लिक करा. सूचना: **हे ‘डॉ. अभ्युदय वर्मा. एम.डी(जनरल मेडिसीन), DNB Endocrinology Consultant Endocrinologist at SEWA clinic, Indoreयांचे लेखन Abbott India यांच्याशी भागीदारीत आहे. या सामग्रीतील माहिती ही केवळ सर्वसाधारण जागृतीसाठी आहे आणि यातून कोणताही वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला नाही. कृपया तुमच्या तब्येतीविषयी तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. संदर्भ:
  1. Ritu G, Gupta A. Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions. Nutrients 2014, 6, 729-775
  2. Aparna P et al. Vitamin D deficiency in India. Family Med Prim Care. 2018 Mar-Apr; 7(2): 324–330.
  3. Goel S. Vitamin D status in Indian subjects: a retrospective analysis. Int J Res Orthop. 2020 May;6(3):603-610
  4. Zhang and Naughton. Vitamin D in health and disease: Current perspectives. Nutrition Journal 2010, 9:65
  5. Nair R, Maseeh A. Vitamin D: The “sunshine” vitamin. J Pharmacol Pharmacother. 2012 Apr-Jun; 3(2): 118–126.
  6. Kennel KA, Drake MT, Hurley DL. Vitamin D Deficiency in Adults: When to Test and How to Treat. Mayo Clin Proc. 2010;85(8):752-758
  7. Cleveland Clinic. Vitamin D Deficiency. Available at: https://my.clevelandclinic.org/health/articles/15050-vitamin-d--vitamin-d-deficiency
  8. Bothiraja C, Pawar A & Deshpande G. Ex vivo absorption study of a nanoparticle based novel drug delivery system of vitamin D3(Arachitol Nano™) using everted intestinal sac technique. J Pharma Investing. 2016;46(5):425-432.
  ही भागीदारीची पोस्ट आहे.
  First published:

  पुढील बातम्या