CycloneVayu: गुजरातमध्ये हाय अलर्ट तर राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर?

CycloneVayu: गुजरातमध्ये हाय अलर्ट तर राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर?

CycloneVayu : पुढच्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

  • Share this:

मुंबई, 12 जून: येत्या 24 तासांत वायू चक्रीवादळ गुजरातला धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मंगळवारी वायू चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं. मुंबईसह कोकण किनारपट्टीला याचा तितकासा धोका नसला तरही मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वेगानं वारे वाहू लागले आहेत. तसंच पुढील 48 तासांत मच्छिमारांसह नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

या चक्रीवादळाचा वेग ताशी 55 ते 100 किलोमीटर इतका असेल. यादरम्यान तुफान पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीसाठी एनडीआरएफची पथक तैनात करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. वायू चक्रीवादळ येण्याआधी गुजरात प्रशासनही सज्ज झालं आहे. गुजरातमधील काही भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या शाळांनाही सुट्टी असेल. दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून पोरबंदर जिल्ह्यातील 74 गावांमधील 35 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. कच्छ, द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे 3 बळी

महाराष्ट्रात मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र पुढील 24 तासांत मुंबई, कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्री वादळाचा महाराष्ट्राला विशेष तडाखा बसणार नसला तरी कोकण किनारपट्टी आणि मुंबईत येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडू शकतो. पण हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात उतरू नये, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

या चक्रीवादळामुळे मान्सूनची वाट मात्र केरळमध्येच अडवून धरलीय या चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यानंतरच मान्सून गोव्यामार्गे महाराष्टात येईल. साधारण 14 सारखेला मान्सूनचं कोकण किनारपट्टीवर आमगन होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

 

वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, VIDEO व्हायरल

First published: June 12, 2019, 6:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading