Home /News /news /

Cyclone Tauktae : हवामानाचा आनंद घ्या, घरीच राहा, मुंबई पालिकेनं केलं आवाहन

Cyclone Tauktae : हवामानाचा आनंद घ्या, घरीच राहा, मुंबई पालिकेनं केलं आवाहन

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईपासून 170 किमी अंतरावरून हे चक्रीवादळ

    मुंबई, 17 मे :  अखेर तोक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) मुंबईच्या (Mumbai) समुद्रीकिनारी भागापासून मार्गक्रमण होत आहे. मुंबईपासून 170 किमी अंतरावरून हे वादळ गुजरातच्या (Gujrat) दिशेनं निघाले आहे. त्यामुळे मुंबईत वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई वाऱ्याचा वेग जास्त राहणार असून समुद्रीकिनाऱ्यालगत भागात प्रवास करू नका,  असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून तोक्ते चक्रीवादळाने अरबी समुद्रात बस्तान मांडले आहे. केरळ, गोव्याच्या समुद्रीकिनाऱ्यालगत असलेल्या भागात चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. आता हे वादळ मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई महापालिकेनं ट्वीट करून सर्व मुंबईकरांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. 'हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ मुंबईजवळ येताच वा वाऱ्याचा वेग वाढेल. कृपया किनारपट्टीजवळील प्रवास करणे टाळा. घरीच रहा, हवामानाचा आनंद घ्या' असं आवाहन पालिकेनं केलं आहे. चीनकडून मदतीची अपेक्षा नाही! ऑक्सिजन तुटवड्यामुळं नेपाळचं मदतीसाठी भारताला साकडं तोक्ते वादळ मुंबईच्या समुद्रीकिनाऱ्यालगत पोहोचले असता प्रभाव कमी झाला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईपासून 170 किमी अंतरावरून हे चक्रीवादळ जाणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या