मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Online Fraud मध्ये मोठी वाढ, कोरोना काळात समोर आल्या 5000 हून अधिक बनावट वेबसाईट

Online Fraud मध्ये मोठी वाढ, कोरोना काळात समोर आल्या 5000 हून अधिक बनावट वेबसाईट

कोरोनाच्या नावाने फसवणूक करताना सायबर क्रिमिनल्सचं लक्ष्य युजर्सचा डेटा मिळवणं हे असतं.

कोरोनाच्या नावाने फसवणूक करताना सायबर क्रिमिनल्सचं लक्ष्य युजर्सचा डेटा मिळवणं हे असतं.

कोरोनाच्या नावाने फसवणूक करताना सायबर क्रिमिनल्सचं लक्ष्य युजर्सचा डेटा मिळवणं हे असतं.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. फिशिंग वेबसाईटमध्येही वाढ झाली आहे. कोरोना काळापासून 5000 हून अधिक कोरोनासंबंधित फिशिंग वेबसाईट्स समोर आल्या आहेत. या वेबसाईट बनावट पेमेंट ऑफर, डिस्काउंटमध्ये कोविड टेस्ट अशा अनेक गोष्टींद्वारे युजर्सची माहिती चोरी करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्या होत्या. तसंच काही दिवसांपासून रेस्टोरेंट्स आणि पब्लिक इव्हेट्ससाठी बनावट QR कोड आणि वॅक्सिनेशन सर्टिफिकेट्ससाठी फिशिंग अॅड्सद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. सायबर सिक्योरिटी फर्म Kaspersky ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 ते जुलै 2021 पर्यंत अशा फिशिंग वेबसाईटवर जाणाऱ्या, अशा वेबसाईट ओपन करणाऱ्या एक मिलियनहून अधिक युजर्सला वाचवण्यात आलं आहे. मार्च 2021 मध्ये कोरोनासंबंधित स्कॅम करण्याचा प्रकार सर्वात टॉपला होता. कोरोनाच्या नावाने फसवणूक करताना सायबर क्रिमिनल्सचं लक्ष्य युजर्सचा डेटा मिळवणं हे असतं. फिशिंगचा उपयोग यासाठी केला जातो, की युजर एखादी जाहिरात किंवा ईमेलच्या लिंकवर क्लिक करतो आणि एखाद्या पेजवर येतो. इथे पेजवर युजरसा बँकिंग डिटेल्स विचारले जातात. एकदा युजरने हे डिटेल्स भरल्यानंतर, ही माहिती फ्रॉडस्टर्सकडे पोहोचते आणि फ्रॉड करणारे अकाउंटमधून पैसे काढून घेतात.

WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स

फसवणुकीचे प्रकार हे सध्याच्या परिस्थितीला अनुसरुन केले जातात. त्यामुळे सध्या कोरोना टेस्ट, वॅक्सिनेशन नावाने ऑनलाईन फ्रॉडमध्ये वाढ झाली आहे.

तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवतील या स्मार्ट Tips, वाचा Security Tricks

त्यामुळे अशा ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी युजर्सनी सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करुन आपले पर्सनल डिटेल्स देऊ नका. तसंच ईमेलवर आलेल्या अनोळखी मेलवरही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
First published:

पुढील बातम्या