इंदोरीकरांवर नाही होणार कारवाई, सायबर सेलकडून मोठा दिलासा

इंदोरीकरांवर नाही होणार कारवाई, सायबर सेलकडून मोठा दिलासा

ज्या किर्तनातील वक्यव्यामुळे इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे इंदोरीकरांविरोधात कोणताही पुरावा सायबर सेलला मिळाला नाही.

  • Share this:

अहमदनगर, 25 फेब्रुवारी : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण यामध्ये सायबर सेलकडून इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. आक्षेपार्ह्य किर्तनाचा कोणताही व्हिडिओ युट्यूवर नसल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे.

ज्या किर्तनातील वक्यव्यामुळे इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे इंदोरीकरांविरोधात कोणताही पुरावा सायबर सेलला मिळाला नाही. सक्षम पुरावे नसल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आहे. त्यामुळे हा इंदोरीकरांसाठी मोठा दिलासा आहे.

'मी तसं बोललोच नाही...', इंदोरीकर महाराजांनी केला अजब दावा

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देताना मी तसं बोललोच नाही असं इंदोरीकर म्हणाले होते. 'यूट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंगदेखील करत नाही. मी तसं वक्तव्य केलं नाही,' असा दावा या उत्तरात इंदोरीकर महाराजांनी केला होता.

इतर बातम्या - धनंजय मुंडे झाले ‘शिवकन्ये’चे बाप, रेल्वे ट्रॅकवरील मुलीचं स्वीकारलं पालकत्व

'मी ते वाक्य बोललोच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्याने महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाला आहे. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही,' असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी आपली बाजू मांडली होती. दरम्यान, प्रकरणाची माध्यमांमध्ये चर्चा सुरू होताच युट्यूबवरून हे वादग्रस्त किर्तन काढून टाकण्यात आल्याचंही बोललं जात आहे.

इतर बातम्या - क्रुरतेचा कळस! मटण चोरलं म्हणून दुकानदाराने कुत्र्याच्या पाठीत घुपसला चाकू

नेमकं इंदोरीकर महाराज काय म्हणाले होते?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

इतर बातम्या - पुण्यात भोंदू बाबाकडून 5 महिलांचं लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलींना केलं नग्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 12:43 PM IST

ताज्या बातम्या