पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताच्या 100 वेबसाईट हॅक

पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताच्या 100 वेबसाईट हॅक

पाकिस्तानी हॅकर्सनं भारतातील 100 वेबसाईटहॅक केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी हॅकर्सनं भारतावर सायबर अटॅक केला आहे. पाकिस्तानी हॅकर्सनं भारताच्या 100 वेबसाईट हॅक केल्या आहेत. यामध्ये नाजपूर भाजप आणि गुजरात सरकारच्या वेबसाईटचा देखील समावेश आहे. यापूर्वी याच हॅकर्सनं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट देखील हॅक केली होती. त्यानंतर पाकिस्ताननं भारताला यासाठी जबाबदार धरलं होतं. पण, आता याच हॅकर्सनं भारताच्या 100 वेबसाईट हॅक केल्यानं पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सिद्ध झालं आहे.

दरम्यान, या हॅकर्सनं गुजरातमधील भाजप नेत्याची ब्लॉग साईड देखील हॅक केली आहे. या सायबर अटॅकवर आता भारतानं काम सुरू केलं आहे. सायबर अटॅकमुळे आता हॅक झालेल्या वेबसाईट सुरू करणं अवघड होऊन बसलं आहे. परदेशातून देखील त्याबद्दल सध्या तक्रारी येत आहेत.

VIDEO: दहशतवाद्यांना हाकलण्यासाठी शिवाजी महाराजांची युद्धनितीच वापरावी लागेल - संभाजीराजे

First published: February 19, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या