मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

CWG 2022 : टीम इंडिया पुन्हा ठरली चोकर्स, 4 प्रमुख कारणांमुळे हुकलं गोल्ड मेडल

CWG 2022 : टीम इंडिया पुन्हा ठरली चोकर्स, 4 प्रमुख कारणांमुळे हुकलं गोल्ड मेडल

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळवण्यात भारतीय महिला क्रिकेट टीमला अपयश आले. टीम इंडियाच्या पराभवाची 4 प्रमुख कारणं आहेत.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळवण्यात भारतीय महिला क्रिकेट टीमला अपयश आले. टीम इंडियाच्या पराभवाची 4 प्रमुख कारणं आहेत.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळवण्यात भारतीय महिला क्रिकेट टीमला अपयश आले. टीम इंडियाच्या पराभवाची 4 प्रमुख कारणं आहेत.

    मुंबई, 8 ऑगस्ट : वर्ल्ड कप, टी20 वर्ल्ड कपनंतर कॉमनवेल्थ गेम्समध्येही (Commonwealth Games 2022) भारतीय महिला क्रिकेट टीम (Team India Women) निर्णायक क्षणी खेळ उंचावण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाचा (India women vs Australia Women) 9 रननं पराभव झाला. ऑस्ट्रेलियानं फायनल मॅच जिंकण्यासाठी 162 रनचं लक्ष्य दिलं होतं. पण टीम इंडिया 152 रनवरच ऑल आऊट झाली. या पराभवामुळे भारतीय टीमचं ऐतिहासिक गोल्ड मेडल हुकले. टीम इंडियाच्या या पराभावाची 4 प्रमुख कारणं काय आहेत ते पाहूया बॉलर्सचं अपयश कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलमध्ये रेणुका सिंहनं तिसऱ्याच ओव्हर्समध्ये एलिसा हिलीला आऊट करत टीम इंडियाला यश मिळवून दिलं. त्यानंतर आठव्या ओव्हरपर्यंत भारताला एकही विकेट मिळाली नाही. विकेट मिळवण्यासाठी रेणुकानं पहिला स्पेल तीन ओव्हर्सचा टाकला. रेणुकाला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर दबाव टाकू शकली नाही. प्रमुख बॉलर्स विकेट्स घेण्यात अपयशी ठरत असताना कॅप्टन हरमनप्रीत कौरनंही बॉलिंग केली. हरमनच्या एकमेव ओव्हरमध्ये 17 रन गेले. मेघना सिंहनं 2 ओव्हर्समध्ये 11 रन दिले पण तरही तिला तिसरी ओव्हर मिळाली नाही. स्मृती-शफाली फेल 162 रनचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली तेव्हा ओपनर्सवर मोठी आशा होती. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही ओपनिंग जोडी फायनलमध्ये अपयशी ठरली. स्मृतीनं 6 तर शफालीनं 11 रन केले. 22 रनमध्येच टीम इंडियानं पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. भक्कम सुरूवात करून देण्यात भारतीय ओपनर्सना आलेलं अपयश हे टीम इंडियाच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं. CWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये खेळली चक्क कोरोना पॉझिटिव्ह ऑस्ट्रेलियन खेळाडू बॅटींग कोसळली हरमनप्रीत कौर (65) आणि जेमिमा रोड्रिग्स (33) यांनी तिसऱ्या विकेट्ससाठी 96 रनची पार्टनरशिप करत मॅचचं पारडं भारताकडं झुकवलं होतं. जेमिमा 15 व्या ओव्हरमध्ये आऊट झाली तेव्हा भारतीय टीमला विजयासाठी 44 रनची आवश्यकता होती. पण त्यानंतर भारतीय बॅटींग ऑर्डर कोसळली. टीम इंडियानं  फक्त 31 रनमध्ये 7 विकेट्स गमावल्या. त्यामध्ये कॅप्टन हरमनची विकेट सर्वात निर्णायक ठरली. दबाव झेलण्यात अपयश यापूर्वी झालेल्या आयसीसी स्पर्धांच्या नॉक आऊट मॅच प्रमाणे या फायनलमध्येही भारतीय महिला टीमच्या पराभवाचं हे सर्वात मोठं कारण ठरलं. फायनल मॅचचं प्रेशर भारतीय बॅटर्स सहन करू शकल्या नाहीत. निर्णायक क्षणी 3 भारतीय बॅटर्स रन आऊट झाल्या.ऑस्ट्रेलियन टीमनंही बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीन्ही प्रकारात खेळ उंचावत टीम इंडियावर दबाव वाढवला. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट टीमला अखेर सिल्व्हर मेडलवरच समाधान मानावं लागलं.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या