• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • मागवला आयफोन, आला साबण! पण ग्राहक ठरला चोरावर मोर

मागवला आयफोन, आला साबण! पण ग्राहक ठरला चोरावर मोर

अमेझॉनवरून आयफोन मागवला असताना प्रत्यक्षात मात्र एक धुण्याचा साबण आणि 5 रुपयांचं (Customer ordered Iphone from Amazon but received soap) नाणं पार्सलमधून आल्याची घटना उघडकीला आली आहे.

 • Share this:
  तिरुवनंतपुरम, 25 ऑक्टोबर : अमेझॉनवरून आयफोन मागवला असताना प्रत्यक्षात मात्र एक धुण्याचा साबण आणि 5 रुपयांचं (Customer ordered Iphone from Amazon but received soap) नाणं पार्सलमधून आल्याची घटना उघडकीला आली आहे. या ग्राहकाने ऑनलाईन पैसे भरत आयफोनची (Online order of Iphone) ऑर्डर दिली होती. मात्र प्रत्यक्षात आपली फसवूणक झाल्याचं लक्षात आलं. विशेष म्हणजे आपली (Prepared for fraud) फसवणूक होण्याची शक्यता आहे, हे त्या ग्राहकाला कुरिअर येण्यापूर्वीच समजलं आणि त्यानं एक शक्कल लढवली. असा आला अंदाज केरळमधील अलूवामध्ये राहणाऱ्या नूरुल अमीन यांनी 12 ऑक्टोबर रोजी आयफोन ऑर्डर केला होता. अमेझॉन पे कार्डवरून 70 हजार 900 रुपये खर्च करून त्यांनी आयफोन-12 ची ऑर्डर नोंदवली होती. अमेझॉनचे नेहमीच ग्राहक असल्यामुळे नुरूल ते आपल्या ऑर्डरला ट्रॅक करत होते. हैद्राबादहून केरळला पोहोचण्यापूर्वी वाटेत सलेममध्ये फोन एक दिवस थांबल्याचं त्यांच्या लक्षात आलं. नेहमी दोन दिवसांत येणारी ऑर्डर यायला तीन दिवस लागल्यामुळे त्यांचा संशय बळावला. अशी लढवली कल्पना त्यांचं पार्सल घेऊन जेव्हा डिलिवरी बॉय दारात आला, तेव्हा त्याच्यासमोरच त्यांनी पार्सल फोडलं आणि पार्सलचं व्हिडिओ शूटिंग केलं. पार्सल फोडल्यावर त्यात व्हीम बार साबण आणि पाच रुपयांचं एक नाणं असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यांनी यासंदर्भात अमेएझॉनकडे तक्रारही नोंदवली आणि पोलिसांतही तक्रार दिली. हे वाचा- ब्रश करताना तुम्हीही अशा चुका करत नाही ना? या पद्धतीनं दात राहतील स्वच्छ, चमकदार झाला होता घोळ नुरुल यांनी जो फोन ऑर्डर केला होता, तो प्रत्यक्षात उपलब्धच नसल्याचं लक्षात आलं. हा फोन झारखंडमधील एक व्यक्ती 25 सप्टेंबरपासून वापरत होती. म्हणजेच जो फोन 12 ऑक्टोबरला ऑर्डर केला, तो त्याअगोदरच विकला गेला होता. मात्र वेबसाईटवरून तो हटवला गेला नसल्यामुळे कदाचित हा प्रकार घडला असावा, असं सांगण्यात आलं. कंपनीकडे सध्या तो मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे नुरुल यांना कंपनीनं त्यांचे पैसे परत केले. नुरुल यांच्या सजगपणामुळेत त्यांचं नुकसान टळलं.
  Published by:desk news
  First published: