• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • तुम्हाला माहीत आहे का? रडण्यामुळंही वजन होतं कमी; संशोधकांनी सांगितली योग्य वेळही

तुम्हाला माहीत आहे का? रडण्यामुळंही वजन होतं कमी; संशोधकांनी सांगितली योग्य वेळही

रडणं हे तुमच्या भावनेशी संबंधित आहे, ही एक भावनिक कृती आहे. तुम्ही दुःखी असताना, हसताना, चित्रपट पाहत असताना किंवा एखादे पुस्तक वाचताना रडू शकता. सहजतेनं आलेलं रडणं तुमचं वजन कमी करण्यास मदत करू शकतं.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 26 ऑक्टोबर : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी (Weight Control) आपण अनेक उपाय करत असतो. आहारावर नियंत्रण ठेवण्यापासून ते तासन् तास वर्कआउट करूनही अनेकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा परिस्थितीत जर रडून (Crying) तुमचे वजन कमी होऊ शकते असे, जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही काय म्हणाल… खरे तर, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात रडल्याने वजन कमी होण्यास मदत होते, असे समोर (Weight Control tips) आलं आहे. रडणं हे तुमच्या भावनेशी संबंधित आहे, ही एक भावनिक कृती आहे. तुम्ही दुःखी असताना, हसताना, चित्रपट पाहत असताना किंवा एखादे पुस्तक वाचताना रडू शकता. सहजतेनं आलेलं रडणं तुमचं वजन कमी करण्यास मदत करू शकतं. मात्र, खोटे अश्रू काढून रडल्याने तुमच्या वजनावर अजिबात परिणाम होणार नाही हे लक्षात ठेवा. 'द मिस्ट्री ऑफ टीयर्स' या नावाने प्रकाशित झालेल्या संशोधनात संशोधक विल्यम फ्रे यांनी रडण्यामुळे वजन कसे कमी होते, याबाबत सांगितले आहे. संशोधनात त्यांनी अश्रूंचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या संशोधनानुसार, जर तुमचे अश्रू खरे असतील किंवा आतून आलेले असतील तरच तुमची रडल्याने चरबी जळू शकते. संशोधकाच्या मते, जेव्हा आपण रडतो तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल हार्मोन सोडते. आपल्या शरीरातील कोर्टिसोल हार्मोनच्या या वाढीव पातळीमुळे चरबी कमी होते. तणावामुळे बाहेर पडणारे अश्रू आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, जे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. विल्यम फ्रे, एक प्रसिद्ध बायोकेमिस्ट आहेत. त्यांनी या संशोधनाच्या निष्कर्षांचे समर्थन केलं आहे. संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत तुम्ही रडून तुमच्या नकारात्मक भावनांपासून मुक्त होऊ शकता. रडण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, कारण या वेळी कोर्टिसोन बाहेर पडण्याची सर्वात चांगली वेळ असते. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
  Published by:News18 Desk
  First published: