क्रुझर आणि मारुती सुझुकी इकोची समोरासमोर धडक, गाडी जळून खाक, पाहा हा VIDEO

क्रुझर आणि मारुती सुझुकी इकोची समोरासमोर धडक, गाडी जळून खाक, पाहा हा VIDEO

अहमदनगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी फाट्याजवळ ही भीषण अपघाताची घटना घडली आहे.

  • Share this:

जुन्नर, 17 जून : अहमदनगर-कल्याण महामार्गावर  बेल्हे गावाजवळ दोन कारने समोरासमोर धडक दिल्यानंतर पेट घेतल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन महिला आणि एक पुरुष जखमी झाले  आहेत.

अहमदनगर-कल्याण महामार्गावर  गुंजाळवाडी फाटा नजीक स्वामी समर्थ लॉनसमोर  मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास हा अपघात घडला.   क्रुझर आणि मारुती सुझुकीची इको या कारची समोरासमोर धडक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास नमाजी शिंदे हे कुटुंबाला घेऊन इको कारने बेल्ह्याहून पुणे येथे घरी जात असताना गुंजाळवाडी फाटा इथं पोहोचल्यावर समोरून येणार्या क्रुझरने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, याच  इको कारने पेट घेतला.

कारला आग लागल्यानंतर महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक ग्रामस्थ रामदास गुंजाळ, बबड्या गुंजाळ आदी ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन  पेटलेल्या गाडीतून या तिघांना बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.या घटनेत 2 महिला देखील भाजल्या आहेत.

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना आळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 8:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या