पुलवामामधील शहिदांना अमिताभ, आमिर आणि रणबीरने अशी दिली श्रद्धांजली

पुलवामामधील शहिदांना अमिताभ, आमिर आणि रणबीरने अशी दिली श्रद्धांजली

जम्मू- काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता.

  • Share this:

मुंबई, १९ एप्रिल- जम्मू- काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. आता सीआरपीएफने बॉलिवूड कलाकारांसोबत शहीद झालेल्या जवानांच्या शौऱ्याला सलाम करत अनोखी श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतला. शहीद सीआरपीएफ जवांनांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी एक गाणं शूट केलं आहे.

या गाण्यात अमिताभ बच्चन, आमिर खान आणि रणबीर कपूर दिसतो. या गाण्याचं नाव तू देश मेरा असं असणार आहे. नुकतेच या गाण्याचं चित्रीकरण संपवण्यात आलं.

याबद्दल सीआरपीएफने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली. याबद्दल ट्वीट करताना आमिर, अमिताभ आणि रणबीरचे फोटो ट्वीट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अमिताभ बच्चन, आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी तू देश मेरा या गाण्यासाठी नुकतंच चित्रीकरण पूर्ण केलं. हे गाणं पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना समर्पित आहे. आम्ही सर्वांचे आभारी आहोत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला.’

VIDEO: 'चुनाव का महिना राफेल करे शोर', आव्हाडांचा गाण्यातून मोदींवर निशाणा

First published: April 19, 2019, 3:59 PM IST
Tags: CRPF

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading