काश्मीरमध्ये 'सुपर 500' महिला कमांडो रोखणार दगडफेक !

काश्मीरमध्ये 'सुपर 500' महिला कमांडो रोखणार दगडफेक !

काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या हिंसाचारात महिला, तरुण दगडफेकीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे निदर्शनास आले आहे

  • Share this:

काश्मीर,29 जून : काश्मीरमधील  दगडफेकीचा बिमोड करण्यासाठी सरकारने 'सुपर 500' चा उपाय शोधलाय. याअंतर्गत 500 विशेष महिला कमांडो तयार केल्या जाणार आहेत. यासाठी श्रीनगरमध्ये एक ट्रेनिंग कँप चालवला जात आहे.

काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या हिंसाचारात महिला, तरुण दगडफेकीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे भारतीय जवानांना त्यांचा मुकाबला करणे कठीण जाते. म्हणून आता सरकारने आता नवीन उपाय शोधलाय.

सुपर 500 मध्ये या महिलांना दगडफेकीवर नियंत्रण करण्यासाठी तीन स्तरावर प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यात आधी स्वसुरक्षेचेही धडे दिले जातील. एका महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांना सैन्यात समाविष्ट केले जाईल. येणाऱ्या काही दिवसात सुपर500 ला सेनेच्या इतर ऑपरेशनमध्येही समाविष्ट करण्याची योजना आहे. त्यांना कोंबिंग, एन्काउंटर आणि रेस्क्यू ऑपरेशन सारखी महत्वपूर्ण प्रशिक्षणेही दिले जात आहेत.

मागील बऱ्याच वर्षांपासून भारतीय सुरक्षाबळांवर मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचे आरोप लागत आले आहेत. म्हणून आता सेनेने सुपर500 चा रामबाण उपाय शोधलाय.

याशिवाय पावसाच्या काळात दूरून निशाणा लावण्याचाही अभ्यास केला जात आहे. जिथे मोठी हत्यारे घेऊन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी छोटी हत्यारे कशी वापरावीत याचेही प्रशिक्षण दिले जात आहे.

हेही वाचा

विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

 VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

अश्विनी बिद्रेंच्या मारेकऱ्याचं नाव पोलीस बढतीच्या यादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 10:24 PM IST

ताज्या बातम्या