CRPFच्या जवानामुळे वाचले आई आणि बाळाचे प्राण

सीआरपीएफ जवानानं रक्तदन केल्यानं आई आणि मुलाचा जीव वाचला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 12:15 PM IST

CRPFच्या जवानामुळे वाचले आई आणि बाळाचे प्राण

श्रीनगर, 22 एप्रिल : काश्मीरमधील जवानाचं आयुष्य कसं असतं हे आपणा सर्वांना माहित आहे. कर्तव्य बजावण्यामध्ये जवान कोणताही कसूर सोडत नाहीत. पण, सीआरपीएफमधील जवानानं केलेली कृती पाहून तुमचा ऊर आणखी अभिमानानं भरून येईल. जवानांवर दगडफेकीच्या घटना देखील होत असतात. पण, त्यानंतर देखील हे जवान आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाहीत.


दरम्यान, एका गरोदर महिलेला रूग्णालयात दखल करण्यात आलं. पण, तिच्या प्रकृतीमध्ये बिघाड होत गेला. त्यानंतर डॉक्टरांनी त्वरीत रक्ताची व्यवस्था करा असं कुटुंबियांना सांगितलं. नातेवाईकांसह सर्वजण रक्ताकरता धावाधाव करू लागले. पण, वेळ निघून जात होता. अशा वेळी सीआरपीएफच्या जवानानं रक्तदान करून महिलेचा जीव वाचवला. गरोदर महिलेची प्रसुती झाली असून बाळ आणि आई सुखरूप आहेत.
सध्या रक्तदान करणाऱ्या जवानाचा आणि नवजात बाळाचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाय, सीआरपीएफनं देखील हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वी मुलीचा जीव वाचवण्यासाठी 4 जवानांनी देखील रक्तदान कलं होतं. यातील दोन मुस्लिम जवानांनी आपला रोझा देखील तोडला होता. शिवाय, नक्षलवाद्याचा जीव वाचवण्यासाठी देखील जवानानं रक्तदान केलं आहे.


SPECIAL REPORT : पवार, मोहिते पाटील आणि मुख्यमंत्री...माढ्यात जोरदार संघर्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...