CRPF मध्ये डाॅक्टर पदासाठी 92 जागा, 'असा' करा अर्ज

CRPF, Jobs, Doctors - केंद्रीय राखीव पोलीस दलात तुम्हाला काम करायचंय? मग तुम्हाला उत्तम संधी आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 03:30 PM IST

CRPF मध्ये डाॅक्टर पदासाठी 92 जागा, 'असा' करा अर्ज

मुंबई, 6 जुलै : केंद्रीय राखीव पोलीस दलात तुम्हाला काम करायचंय? तुम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये आहात? मग तुम्हाला उत्तम संधी आहे. स्पेशलिस्ट MOs, डेंटल सर्जन, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर या पदांवर व्हेकन्सीज् आहेत. एकूण 92 पदं आहेत. https://www.crpf.gov.in/ इथे क्लिक करून माहिती घेता येईल.

पदं आणि पद संख्या

स्पेशलिस्ट MOs - 7

डेंटल सर्जन - 1

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर - 84

Loading...

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 'असा' होईल फायदा

शैक्षणिक पात्रता

स्पेशलिस्ट MOs - 1.संबंधित पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा  2. पदव्युत्तर पदवीधारकांसाठी दीड वर्षांचा अनुभव आणि  डिप्लोमाधारकांसाठी अडीच वर्षाचा अनुभव

डेंटल सर्जन - डेंटल सर्जरी पदवी

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर - MBBS , इंटर्नशिप

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय आणि वर्षाला कमवा लाखो रुपये

वयाची अट

या पदांसाठी 30 जुलै 2019 पर्यंत 67 वर्ष पूर्ण हवीत.

पूर्ण भारतभर कुठेही पोस्टिंग होऊ शकतं. अर्जासाठी फी नाही. 30 आणि 31 जुलैला थेट मुलाखत होईल.

मुलाखतीची ठिकाणं

कंपोझिट हॉस्पिटल,CRPF, बिलासपूर/रांची/नागपूर/मणिपूर/ जम्मू/श्रीनगर

या तीन पदांसाठी एकूण 92 पदं आहेत. https://www.crpf.gov.in/ इथे क्लिक करून माहिती घेता येईल.

10वी पास असलेल्यांना ड्रायव्हरची संधी, 'या' उमेदवारांची होईल निवड

तसंच सशस्त्र सेना वैद्यकीय भरती सुरू आहे. आर्म्ड फोर्स मेडिकल सर्विसेस (AFMS )नं शाॅर्ट सर्विस कमिशन्ड ( SSC ) आॅफिसर पदासाठी अर्ज मागवलेत. जे एमबीबीएस उत्तीर्ण आहेत त्यांनी या पदासाठी अर्ज करावा. SSC आॅफिसर पदासाठी 150 जागा आहेत.

पद

शाॅर्ट सर्विस कमिशन्ड ( SSC )

एकूण जागा

150

शैक्षणिक पात्रता

MBBS, डिप्लोमाधारकही अर्ज करू शकतात

वयाची अट

31 डिसेंबर 2019ला 45 वर्षापर्यंत

अर्जाची फी

200 रुपये

आॅनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 जुलै 2019

मुलाखतीचं ठिकाण

आर्मी हाॅस्पिटल, दिल्ली

अर्ज करण्यासाठी https://amcsscentry.gov.in/doc/signup या लिंकवर क्लिक करा. सैन्यात डाॅक्टर म्हणून काम करण्याची ही चांगली संधी आहे.

VIDEO: मालाडमध्ये पुन्हा भिंत कोसळली, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: CRPF
First Published: Jul 6, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...