CRPFची नवी रणनीती; 'रुको, देखो और समय लो'

CRPFची नवी रणनीती; 'रुको, देखो और समय लो'

दहशतवाद्यांचा खात्मा करताना सीआरपीएफनं आपली रणनीती बदलली आहे. त्यासाठी जवानांना 'रुको, देखो और समय लो'नुसार काम करण्यास सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 5 मार्च : दहशतवाद्यांचा खात्मा करताना जवान शहीद होण्याचं प्रमाण आता वाढताना दिसतंय. एका रिपोर्टनुसार तर एका दहशतवाद्यामागे दोन जवान शहीद होत असल्याची आकडेवारी समोर आली होती. शिवाय, दहशतवाद्यांना खात्मा करताना रविवारी सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. त्यानंतर आता सीआरपीएफनं आपली रणनीती बदलली आहे. यापुढे 'रुको, देखो और समय लो' अशी रणनीती आता सीआरपीएफनं आखली आहे.

रविवारी जवळपास 48 तास दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. यामध्ये एका एन्स्पेक्टरसह 3 जवान शहीद झाले. हंदवाडामधील बाबागुंड गावामध्ये ही चकमक झाली होती. त्यावेळी जर काही काळ जवान थांबले असते तर ही त्यांना त्याचे प्राण गमवावे लागले नसते असं सीआरपीएफच्या अधिकाऱ्यानं म्हटलं. त्यानंतर आता 'स्टॅडर्ज ऑपरेटिंग प्रोसिजर' जारी करण्यात आलं आहे. या नव्या नियमानुसार जवानांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता कारवाई करायची आहे. असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

अफझल गुरूच्या मुलाची मोदी सरकारकडे 'ही' मागणी

स्फोटकांनी उडवलं घर

सध्या काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये रोज चकमक उडत आहे. आज देखील त्रारलमधील मीर मोहल्ला परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर जवानांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करत शोधमोहीम राबवण्यास सुरूवात केली. यादरम्यानच, एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घरच जवानांनी स्फोटकांनी उडवून दिलं.

पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर भारतानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली. त्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. दरम्यान, या कारवाईनंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे सीमेजवळच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

VIDEO: सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारत नंबर 1; 'ही' आहेत सर्वात प्रदूषित शहरं

First published: March 5, 2019, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading