• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • निवडणूक ड्यूटीवर जाण्यावरून पत्नीने थांबवलं, CRPF जवानाने केली हत्या

निवडणूक ड्यूटीवर जाण्यावरून पत्नीने थांबवलं, CRPF जवानाने केली हत्या

निवडणूक ड्यूटीला जाण्यावरून कॉनस्टेबल गुरूवीर सिंह यांचा त्यांच्या पत्नीशी खूप वेळ वाद सुरू होता. पण त्यानंतर वैतागून गुरूवीर यांनी पत्नीची हत्या केली.

 • Share this:
  छत्तीसगड, 20 मार्च : कोबरा बटालियनच्या एका सीआरपीएफ कॉनस्टेबलने त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. छत्तीसगडच्या जगदलपूर क्षेत्रामध्ये काम करत होता. जवान निवडणूक ड्यूटीसाठी असताना पत्नीने जाण्यासाठी नकार दिला त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 मार्चची आहे. निवडणूक ड्यूटीला जाण्यावरून कॉनस्टेबल गुरूवीर सिंह यांचा त्यांच्या पत्नीशी खूप वेळ वाद सुरू होता. पण त्यानंतर वैतागून गुरूवीर यांनी पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर गुरूवीर सिंह यांनी पोलिसांना फोन केला आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली असल्याचा बनाव त्यांनी रचला. पण शवविच्छेदन अहवालानुसार सगळं सत्य समोर आलं. हेही वाचा : 'वैयक्तिक स्वार्थासाठी तुमच्यावर टीका', PM मोदींनी चौकीदारांची मागितली माफी! शवविच्छेदन रिपोर्टनुसार, सिंह यांच्या पत्नीची आत्महत्या नाही तर हत्या झाली असल्याचं स्पष्ट झालं. तर या प्रकरणाचा अधिक तपास करत पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. यात गुरूवीर सिंह यांनीच रागाच्या भरात त्यांच्या पत्नीची हत्या केली असल्याचं समोर आलं. जगदलपूरचे एसपी हेमसागर सिदार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, कॉनस्टेबल गुरूवीर सिंह, जे सीआपीएफच्या 201 कोबरा बटालियनच्या हेडक्वार्टरमध्ये असतात. त्यांनी सरकारी क्वार्टरमध्येच पत्नी अनुप्रिया गौतम यांची गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करताना पोलिसांना सिंह यांचा संशय आला आणि त्यांनी चौकशीची दिशा बदलली. त्यानंतर सिंह यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. VIDEO : भाषणाला ट्रोल करणाऱ्यांना पार्थ पवारांनी दिलं खणखणीत उत्तर
  First published: