आता सलमान खानबद्दल ही अफवा कोणी पसरवली, मुंबईत हजारो नागरिक रस्त्यावर

पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं. तर अशी अफवा कोणी पसरवली याबद्दल पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं. तर अशी अफवा कोणी पसरवली याबद्दल पोलीस तपास करत आहेत.

  • Share this:
भिवंडी, 21 मे : राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा अवलंबण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली असताना सोशल मीडियावर अफवांनी मात्र कहर केला आहे. राज्यात नागरिकांवर उपासमारीचं संकट आल्यानं मदत मिळण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. अशात भिवंडी शहरात सुपरस्टार सलमान खान मदत करण्यासाठी येणार असल्याची अफवा पसरल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सलमान खान येणार म्हटल्यावर रात्री खंडूपाडा परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र यावेळी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचं पहावयास मिळालं. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं. तर अशी अफवा कोणी पसरवली याबद्दल पोलीस तपास करत आहेत. या एका वाक्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियावर झाले ट्रोल खरंतर, सलमान खानने याआधी मदतीचा हात दिला होता. त्यावेळी पिठाच्या पिशव्यांमध्ये 15 हजार रुपये आढल्याची बातमी सोशल मीडियावर फिरत होती. त्यामुळे यावेळीदेखील पैसे मिळतील या भावनेनं लोकांनी अफवेवर विश्वास ठेवला आणि भिवंडीत गर्दी केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की, अभिनेता आमीर खान (Aamir Khan) यानं पैशांचं वाटप छूप्या पद्धतीनं केलं. म्हणजे गव्हाच्या पॅकेट्समधून त्यानं अनेकांना मदत केली. त्याचं अभिनंदनही या व्हिडीओतून करण्यात आलं होतं. मात्र व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ मागील सत्यता स्वत: आमीर खानने ट्विटरच्या माध्यमातून सांगितली होती. देशात कोरोना रुग्णांचा आकडा 1.12 लाखाच्या वर, 3435 जणांचा मृत्यू आमीरने ट्विटरवर असं लिहिलं होतं की, 'मित्रांनो, गव्हाच्या पिशव्यांमध्ये पैसे ठेवणारा तो व्यक्ती मी नव्हे. एकतर ही कहाणी खोटी आहे किंवा या 'रॉबिनहूड'ला सर्वांसमोर यायचं नाही आहे. सुरक्षित राहा. प्रेम'. गव्हाच्या पिशवीतून पैसे वाटणारा कोण होता याबाबत अद्याप माहिती नाही किंवा हा व्हिडीओ खरा होता की खोटा याबाबतही स्पष्ट झालेलं नाही. मात्र तो आमीर खान नाही हे मात्र या ट्वीटनंतर स्पष्ट झालं होतं. नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, लवकरच कोरोनावर मात करण्यासाठी होणार यशस्वी संपादन - रेणुका धायबर
First published: