शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 आणि दोन रुपये अशी रक्कम टाकून विमा कंपनीनं शेतकऱ्यांची थट्टा केलीय.

  • Share this:

शशी केवडकर, बीड,ता.6 जुलै : शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना जाहीर करतं. पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. कारण वाटेत अनेक गिधाडं बसलेली असतात. पिकविमा योजनेच्या अंमलबजावणीतही असंच काहीसं झालंय. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 आणि दोन रुपये अशी रक्कम टाकून विमा कंपनीनं शेतकऱ्यांची थट्टा केलीय.

किती मिळाले पैसे?

७७३ शेतकऱ्यांना एक रुपया

६४९ शेतकऱ्यांना दोन रुपये

50 शेतकऱ्यांना तीन रुपये

702 शेतकऱ्यांना चार रुपये

३९ शेतकऱ्यांना पाच रुपये

'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का?'

'विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्या आणल्या कुणी?'

हा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानभरपाईचा मिळालेला पिकविमा. बसला ना धक्का? बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदुरघाट शाखेत पोहोचलेल्या शेतकऱ्यांनाही पीकविम्याची ही यादी पाहिल्यावर असाच धक्का बसला.

खरंतर बीड जिल्ह्यानं पीक विमा भरून घेण्यात देशात पहिला नंबर मिळवला. जिल्हा बँकेच्या नांदुरघाट शाखेतून १५६९१ शेतकऱ्यांनी युनाटेड इन्शुरन्स कंपनीकडे ५१ लाख ४२ हजार रुपयांचा विम्याचा हप्ता भरला. पण कंपनीनं नुसकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर एक दोन रुपये टाकून क्रूर थट्टा केलीय.

शाळेत विद्यार्थिनीवर 18 जणांचा सामूहिक बलात्कार,शिक्षकही झाले सहभागी

पाण्याच्या टाकीसाठी शोले स्टाईल आंदोलन

नापिकी झाल्यास शेकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून सरकारनं पीकविमा योजना आणली पण पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांची अशी थट्टा सुरु आहे. विमा कंपन्या मात्र हजारो कोटी रुपयांचा नफा कमतवत तुंबड्या भरताहेत. आणि शेतकरी कंगाल होतोय. त्यामुळे सरकारची पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 06:20 PM IST

ताज्या बातम्या