S M L

लग्न न करता रोनाल्डो बनला चार मुलांचा पिता

मैदानावरच्या खेळांबद्दल रोनाल्डोची जशी चर्चा होती तेवढीच चर्चा त्याच्या अफेअर्सबद्दलही होते. वर्ल्ड कपच्या आधी रोनाल्डो चवथ्यांना पिता बनलाय.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 18, 2018 11:49 AM IST

लग्न न करता रोनाल्डो बनला चार मुलांचा पिता

माद्रीद ता.17 जून : फिफा वर्ल्ड कपचा फिवर सध्या सर्व जगभर आहे. त्याचबरोबर स्टार फुटबॉल खेळांडूंविषयी जोरदार चर्चाही रंगली आहे. त्यात आघाडीवर आहे पोर्तुगालचा रंगीला स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो. तीन प्रेमिकांपासून त्याला चार मुलं असून अजुनही तो 'मोस्ट वॉन्टेड' बॅचलर आहे.

मैदानावरच्या खेळांबद्दल रोनाल्डोची जशी चर्चा होती तेवढीच चर्चा त्याच्या अफेअर्सबद्दलही होते. वर्ल्ड कपच्या आधी रोनाल्डो चवथ्यांना पिता बनलाय. त्याची गर्लफ्रेंड आणि स्पेनची प्रसिद्ध मॉडेल जॉर्जियाना रॉड्रीग्ज हिच्यापासून त्याला मुलगी झाली. गेल्या वर्षभरापासून ते दोघं लिव्ह इनमध्ये राहत होते.

2016 मध्ये तिची रोनाल्डोबरोबर स्पेनमध्ये ओळख झाली आणि नंतर मैत्री. मैत्रीच रूपांतर नंतर प्रेमात झालं. मात्र लग्नाच्या भानगडीत तो अजुनही पडला नाही. चवथ्यांदा पिता बनल्यामुळे आपण आनंदी असल्याचं त्यानं एका स्पेनच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.


FIFA वर्ल्डकप प्रेमींसाठी आज सुपर संडे ,एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती

रोनाल्डोची मुलं

वयाच्या 25 व्या वर्षी रोनाल्डोला पहिला मुलगा झाला. एका बारगर्लपासून हा मुलगा झाल्याचं बोललं जातं मात्र तिचं नाव कधीच बाहेर आलं नाही. नंतर सरोगसीव्दारे त्याला जुळी मुलं झाली. मात्र त्याबाबातही बाहेर फार माहिती येवू दिली गेली नाही. चवथ्यावेळी मात्र जार्जियानाचं नाव त्यानं जाहीर केलं.

Loading...
Loading...

बिपाशा आणि रोनाल्डो

पोर्तुगालमध्ये एका पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु आणि रोनाल्डोची ओळख झाली. त्याच पार्टीत रोनाल्डोनं बिपाशाचं चुंबन घेतलं होतं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची खमंग चर्चाही रंगली होती.

रमजान महिना संपला, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध होणार कारवाई!

केजरीवालांच्या मदतीसाठी ममतादीदी-कुमारस्वामींसह 4 मुख्यमंत्री आले धावून !

पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाघा बॉर्डरवर यावर्षी ईदसाठी मिठाई वाटप नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2018 06:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close