मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'न्यायाधीश साहेब 10 लाख नाही दिले तर न्यायालयात धुसून तुमच्या छातीत 7 गोळ्या घालेन'

'न्यायाधीश साहेब 10 लाख नाही दिले तर न्यायालयात धुसून तुमच्या छातीत 7 गोळ्या घालेन'

तपासदरम्यान खुशबूच्या हातावर गन पावडर आढळून आल्यानं तिनंच गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

तपासदरम्यान खुशबूच्या हातावर गन पावडर आढळून आल्यानं तिनंच गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

न्यायाधीशाला थेट चिठ्ठी लिहून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यासोबत 10 लाखांची खंडणीही गुन्हेगाराने मागितली आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
बिहार 18 जानेवारी : गेल्या काही दिवसांत धक्कादायक गुन्हे समोर आले आहेत. आता थेट न्यायाधीशांनाच धमकवण्यात आलं आहे. न्यायाधीशाकडून खंडणी मागण्यात आली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. न्यायाधीशाला थेट चिठ्ठी लिहून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यासोबत 10 लाखांची खंडणीही गुन्हेगाराने मागितली आहे. त्या चिठ्ठीमध्ये गुन्हेगाराने लिहिले आहे की, जर पैसे नाही दिले तर, न्यायालयामध्ये घुसून छातीत 7 गोळ्या घालण्य़ात येतील. न्यायाधिशाकडून खंडणी मागण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 2 हजाराच्या नोटामध्ये मागतली खंडणी मुजफ्फरपुर मधील एडीजे 14 व विशेष न्यायाधीश एक्साइज आणि राकेश मालवीन यांना 9 जानेवारी रोजी ही धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली. सिविल न्यायालयाचे इंचार्ज नाजिर यांनी पोलिसांना सांगितले की, गुन्हेगाराने 10 लाखाची खंडणी ही 2 हजाराच्या नोटांमध्ये मागितली आहे आणि ही खंडणी 14 जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत सदर हॉस्पिटलच्या गेटजवळ पोहचली गेली पाहिजे असे न झाल्यास न्यायालयात घुसून छातीत 7 गोळ्या मारण्यात येतील. इतर बातम्या - Bigg Boss 13 : पारस छाब्रावर भडकला सलमान खान, सर्वांसमोर केली पोलखोल चिठ्ठीमध्ये दिला होता मोबाईलनंबर... तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. न्यायाधीशाला पाठवण्यात आलेल्या चिठ्ठीमध्ये मोबाईलनंबर देखील दिला होता. मात्र तपासानंतर समजले की, तो नंबर चुकीचा आहे. चिठ्ठीत लिहिले होते की, पैसे देण्याच्या आधी या मोबाईल नंबरवर मिसकॉल देणे, मात्र या नंबरवर जास्त बोलण्याचा प्रयत्न केला तर यांचे परिणाम वाईट होतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिठ्ठीमध्ये लिहिले आहे की, अनिल भाई आणि पवन भाई हे तुरुगांत आहे. त्यांना तुमच्याआधीही अनेक न्यायाधीशानी खंडणी पोहचवली आहे. इतर बातम्या - केएल राहुलच्या कामगिरीमुळे दोघांचे संघातील स्थान अडचणीत? देशामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. बिहामध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. मात्र तरीही बिहारमधील कायदा सुव्यवस्था सुधारताना दिसत नाही. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारी वाढत जात आहे.
First published:

Tags: Bihar News

पुढील बातम्या