खडकी पोलीस स्टेशनमधले दोन कुख्यात आरोपी फरार

खडकी पोलीस स्टेशनमधले दोन कुख्यात आरोपी फरार

खडकी पोलिस स्टेशनमधील दोन कुख्यात आरोपी, सिराज आणि सनी पळून गेल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली होती.मात्र अजूनही फरार झालेले आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

  • Share this:

09 एप्रिल : पुणे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा कारभार आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय ,पुणे पोलिस अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलिस स्टेशनमधील दोन कुख्यात आरोपी, सिराज आणि सनी पळून गेल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली होती.मात्र अजूनही फरार झालेले आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

आरोपी  चक्क खिडकीचे गज कापून पळून गेले. त्यांच्यावर खंडणी आणि बकरी चोरी सारखे 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

काही दिवसांपूर्वीच खडकीतील योगिराज खन्दारे नामक एका निष्पाप तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता,

त्याच्याच हत्येच्या कटात सामील असल्याच्या आरोपावरून सिराजला अटक करण्यात आली होती. आता ह्या घटनेमुळे खडकीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2017 08:44 PM IST

ताज्या बातम्या