'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' क्राईम शोच्या अँकरला पत्नीच्या खुनप्रकरणी जन्मठेप !

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' क्राईम शोच्या अँकरला पत्नीच्या खुनप्रकरणी जन्मठेप !

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या लोकप्रिय क्राईम शोचे अँकर -प्रोड्युसर सुहैब इलियासी याला पत्नीच्या हत्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. गेल्या 16 डिसेंबरलाच कोर्टाने त्याला दोषी ठरवलं होतं. याच बहुचर्चित खटल्याचा आज निकाल लागला.

  • Share this:

20 डिसेंबर, नवी दिल्ली : 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या लोकप्रिय क्राईम शोचे अँकर -प्रोड्युसर सुहैब इलियासी याला पत्नीच्या हत्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. गेल्या 16 डिसेंबरलाच कोर्टाने त्याला दोषी ठरवलं होतं. याच बहुचर्चित खटल्याचा आज निकाल लागला. 2000 सालच्या जानेवारी महिन्यात सुहैबची पत्नी अंजू त्याच्याच घरी मृतावस्थेच आढळून आली होती. सुहैबने घरातील कात्रीनेच आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. 28मार्च 2000रोजी त्याला याच पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली होती.

या गुन्ह्यात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सुहैबने पत्नीची हत्या केल्यानंतर सुसाईड नोट लिहून ती आत्महत्या असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला होता. पण पत्नी अंजूच्या नातेवाईकांनी हा खूनच असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. नंतर तो जामिनावरही सुटला आणि त्याने दुसरा विवाह देखील केला पण आज अखेर कोर्टाने त्याला पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलीच. विशेष म्हणजे सुहैबने लंडनमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने दूरदर्शनमध्ये काही काळ न्यूज रिडर म्हणून काम केलं. पुढे त्याने 1998साली 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' हा शो प्रोड्युस करण्यास सुरूवात केलीय. या शोद्वारेच तो लाईमलाईटमध्ये आला होता.

‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या क्राईम टीव्ही शोद्वारे सुहैब इलायसी व्होअरनाईट स्टार बनला होता. त्याच्या शोवरूनच पोलिसांनी कित्येक गुन्हेगारांना बेड्याही घातल्या होत्या. यामुळे प्रेक्षकांसाठी नायक ठरलेला सुहैब स्वतःच्या आयुष्यात मात्र खलनायक ठरलाय. सरकारी वकिलांनी या खटल्यात दोषी ठरलेल्या सुहैब इलायासीच्या फाशीची मागणी केली आहे. सुहैब इलियासीच्या कुटुंबियांनी सांगितले की, सुहैब गुन्ह्यांवर मालिका बनवत होता. यातूनच प्रेरणा घेत त्याने ही घटना घडवून आणली. त्याने हत्येचे प्रकरण आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो.

दरम्यान, ‘मी निर्दोष असून वरच्या कोर्टात या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सुहैबने म्हटलंय. हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. त्यामुळे हे प्रकरण दुर्लभ प्रकरणाच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही.’ असेही सुहैबच्या वकिलाने म्हटले आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...