Elec-widget

नागपूरात चाललं तरी काय? दोन दिवसाच चार खून आणि तीन एटीएमची लुट

नागपूरात चाललं तरी काय? दोन दिवसाच चार खून आणि तीन एटीएमची लुट

दोन दिवसात चार खुनांच्या घटना, तीन एटीएम्सची लुट आणि दिवसाढवळ्या गोळीबारामुळे राज्याची उपराजधानी गुन्ह्याची राजधानी होत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

  • Share this:

प्रविण मुधोळकर, नागपूर,ता.27 जून: दोन दिवसात चार खुनांच्या घटना, तीन एटीएम्सची लुट आणि दिवसाढवळ्या गोळीबारामुळे राज्याची उपराजधानी गुन्ह्याची राजधानी होत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एका पाठोपाठ गुन्ह्याची आकडेवारी मोजण्यापलीकडे पोलिस काय करत आहेत असा सवाल नागरिक विचारत आहेत.

 नीरव मोदीच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार होतेय योजना

 मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना 6 आॅगस्टपर्यंत दिलासा

नागपुरच्या गिट्टीखदान परिसरातील कुख्यात गुंड कुलदीप ऊर्फ पिन्नू पांडेवर टोळीयुद्धातून गोळीबार करण्यात आला. यात पांडेसह इतर दोन नागरिक जखमी झाले. तर जरीपटका भागात निर्ढावलेल्या गुन्हेगारांनी तीन एटीएम फोडून ५४ लाख लंपास रुपये लंपास केले.

 नाणार प्रकल्पावरून सेना आक्रमक,उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांची भेट नाकारली

Loading...

राज्याचे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचं नागपूर मागच्या दोन दिवसात चार खुनांच्या घटनांनी हादरलं. त्यात मंगळवारी पुन्हा एक खुनी थरार घडला. पण या प्रकरणातील आरोपी पकडले गेल्यानं कायदा सुव्यस्था सुरळीत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

जानेवारी 2017 पासून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं काय केलं ?, हायकोर्टाचा सवाल

 'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

दरम्यान गुन्हेगारांच्या मनातून कायद्याचा धाक संपला का असा प्रश्न लोकांना पडलाय. शहरातील गुन्हेगारीचा आलेख पुन्हा उंचावत असून पोलीस नावाची यंत्रणा शहरात आहे की नाही अशीच शंका उपस्थित केली जातीय.

लातूर : अविनाश चव्हाणवर गोळ्या झाडणारा आरोपी संभाजी पाटील निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक!

वाढतं शहरीकरण, अपुरे पोलीस, प्रशिक्षणाचा अभाव आणि अकार्यक्षमतेमुळं पोलीसंचा जो धाक पाहिजे तो धाक सध्या राहिलेला नाही. राजकीय हस्तक्षेपही याला कारणीभूत असल्याची चर्चा नागपूरात होत असते.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com