ऐकावं ते नवलंच, घर फोडी करून OLX वर विकायचे चोरीचं सामान

ऐकावं ते नवलंच, घर फोडी करून OLX वर विकायचे चोरीचं सामान

चोरलेलं सोनं मण्णपुरम गोल्डमध्ये गहाण ठेवून रोकड रक्कम घेऊन फरार व्हायचे चोर

  • Share this:

रायगड, ३१ ऑक्टोबर २०१८- बँक, म्युच्युअल फंड, सोनं असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय असतात. आता चोरांनाही असे पर्याय आवडताना दिसत आहेत. कारण वर्ध्यातल्या घरफोडीत चोरांनी २२० ग्रॅम सोनं आणि १५० ग्रॅम चांदी असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला. घरफोडीतील हे सोनं मण्णप्पुरम गोल्डमध्ये गहाण ठेवून कर्ज उचलत असल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी हे सोनंही जप्त केलं आहे.

हे तर झालं वर्ध्याचं, पण रसायनी, पेण, दादर, कोलाड, रोहा, माणगाव, म्हसळा परिसरातल्या चोरांनी घरफोडी करून चोरीचा माल चक्क OLX वर विकण्याचा प्रकारही घडला आहे. OLX वर माल  विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. सोन्याचा ऐवज आणि सोबतच ३६ मोबाईल, ४ लॅपटॉप, २ गाड्या असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यापैकी काही वस्तू OLX या साइटवर ऑनलाइन विकल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे.

इश्वर अडसुळे राहणार सावर्डे, राजेंद्र चांदीवडे रा. कोपरखैरणे, सनी जैसवाल रा. सावर्डे, प्रविण कांदे, निल मोरे रा. कोपरखैरणे, शरद घावे रा. वसई अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.  त्यांच्याकडुन ३१० ग्राम सोन्याचा ऐवज, ३६ मोबाइल, ४ लॅपटॉप, ३ एल.ई.डी. टीव्ही, एक चारचाकी आणि एक दुचाकी गाडी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात रायगड जिल्हातील २० पेक्षा अधिक घरफोडीकरून चोरी करणाऱ्यांच्या गुन्ह्यांची उकल झाली असून अधिक तपास सुरु आहे.

VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट दिव्याच्या खांबावर

Tags:
First Published: Oct 31, 2018 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading