India vs Australia: युजवेंद्र चहलने 6 विकेट घेत पाडला रेकॉर्ड्सचा पाऊस

ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारा चहल पहिला गोलंदाज ठरला.

  • Share this:

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात युजवेंद्र चहलने अफलातून गोलंदाजी करत ६ गडी बाद केले. चहलला एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यात संघात स्थान दिले गेले नव्हते.

तिसऱ्या सामन्यात चहलने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. हे त्याचं एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ धावांत ५ गडी बाद केले होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १० षटकांत ४२ धावा देत ६ गडी बाद केले.

विशेष म्हणजे, मेलबर्न मैदानावर भारतीय गोलंदाजांचं आतापर्यंतच हे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. याआधी याच मैदानावर २००४ मध्ये अजीत आगरकरने ४२ धावांमध्ये ६ गडी बाद केले होते.

चहल टी२० आणि एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी ६ गडी बाद करणारा जगातील दुसरा खेळाडू झाला आहे. त्याच्याशिवाय श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने हा कारनामा याआधी केला आहे.

चहलच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ५० षटकांचा खेळही खेळू शकली नाही. अवघ्या ४८.४ षटकांत ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २३० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून हँड्सकॉम्बने सर्वाधिक ५८ धावा केल्या. त्याच्याशिवाय शॉन मार्शने ३९ आणि उस्मान ख्वाजाने ३४ धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या