World Cup : धोनी फक्त नाव नाही, ICC ने शेअर केला खास व्हिडिओ

World Cup : धोनी फक्त नाव नाही, ICC ने शेअर केला खास व्हिडिओ

भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक.

  • Share this:

लंडन, 06 जुलै : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय आणि टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. धोनी त्याचा शेवटचा वर्ल्ड कप खेळत आहे. आतापर्यंत त्यानं चार वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यात दोन वेळा धोनीच कर्णधार होता. धोनीच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर आयसीसीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे.

धोनी फक्त नाव नाही तर धोनी एक अशी व्यक्ती आहे ज्यानं जगातील कोट्यवधींना प्रेरणा दिली आहे. असंही आयसीसीने म्हटलं आहे. या व्हिडिओत धोनीच्या बेस्ट फिनिशर खेळीतील क्षण दाखवण्यात आले आहेत. धोनीचा वाढदिवस 7 जुलैला असून त्यानिमित्ताने आयसीसीनं हा खास व्हिडिओ शेअर केला आहे.

आयसीसीनं शेअर केलेल्या व्हिडिओत इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली धोनीबद्दल सांगतात. विराट म्हणतो की, धोनी भारत आणि त्याच्यासाठी खास आहे. त्याच्यासोबत फलंदाजी चांगला अनुभव होता. मी जेव्हा संघात आलो तेव्हा धोनी कर्णधार होता आणि तो नेहमीच राहील. धोनीनं प्रत्येकवेळी सपोर्ट केला आहे.

विराट म्हणाला की, धोनीकडून खूप काही शिकलो तो नेहमीच माझा कर्णधार असेल. विराटशिवाय जसप्रीत बुमराहनंसुद्धा धोनीबद्दल सांगितले आहे. बुमराह म्हणाला, मी 2016 ला पदार्पण केलं तेव्हा धोनी कर्णधार होता. गोलंदाजी करताना धोनी कशी मदत करतो ते बुमराहनं सांगितलं.

वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या खेळीवरून टीका केली जात होती. त्यानं आता निवृत्ती घ्यावी असंही काहींनी म्हटलं होतं. खुद्द धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, मलाही अजून माहिती नाही मी कधी निवृत्ती घेईन.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

First published: July 6, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading