लंडन, 20 जून : वर्ल़्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 241 धावा केल्या. न्यूझीलंडने हे आव्हान तीन चेंडू आणि चार गडी राखून पूर्ण केलं. कर्णधार केन विल्यम्सनने नाबाद 106 धावांची खेळी करून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल हिट विकेट बाद झाला. फटका मारताना तोल गेल्यानं गुप्टिलचा पाय स्टंपला लागला आणि तो बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडचे सलामीवीर कुलीन मुनरो आणि मार्टिन गुप्टिल मैदानात उतरले. मुनरो लवकर बाद झाला. त्यानंतर गुप्टिलने दुसऱ्या विकेटसाठी केन विल्यम्सनसोबत 62 धावांची भागिदारी केली. गुप्टिल 15 व्या षटकात हिट विकेट बाद झाला. क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्विटरवरून त्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
न्यूझीलंडने या विजयासह पाच सामन्यांपैकी चारमध्ये विजय मिळवून गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने आफ्रिकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. आफ्रिकेला सहा सामन्यात फक्त एक सामना जिंकता आला आहे. तर एका सामन्यात पावसामुळे एक गुण मिळाला आहे. आफ्रिका 3 गुणांसह गुणतक्त्यात आठव्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 241 धावांचं आव्हान न्यूझीलंडने केन विल्यम्सनच्या शतकाच्या आणि ग्रॅण्डहोमच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे 49 षटकांच्या झालेल्या या सामन्यात आफ्रिकेला 241 धावा करता आल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर कुलिन मुनरोला रबाडाने बाद करून पहिला दणका दिला. मुनरो 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्टिन गुप्टिल हिटविकेट बाद झाला. गुप्टिल बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम हे दोघेही फक्त एक धाव काढून बाद झाले.
न्यूझीलंडची 4 बाद 80 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर केन विल्यम्सनने जेम्स नीशामसोबत 57 धावांची भागिदारी करत डाव सावरला. जेम्सला बाद करून निशामने ही जोडी फोडली. निशामनंतर आलेल्या ग्रॅण्डहोमने विल्यम्सनसोबत 91 धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या समिप पोहचवले. उंच फटका मारण्याच्या नादात एनगिडीच्या गोलंदाजीवर ग्रँडहोम बाद झाला. त्यानंतर मिशेल सेंटनर आणि केन विल्यम्सनने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. केन विल्यम्सनने शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत शतक केले. त्यानंतर चौकार मारून विजय साजरा केला. त्याने 106 धावा केल्या. आफ्रिकेकडून ख्रिस मोरिसने तीन गडी बाद केले. रबाडा, पेहलुक्वायो आणि एनगिडी यांनी एक गडी बाद केला.
World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल
वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव
वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया
VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल