चुकीच्या मानसिकतेने विराट मैदानात उतरला- आशिष नेहरा

सोनी सिक्समध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन करताना कोहलीला त्याचा अतिआत्मविश्वास नडला असे नेहरा म्हणाला.

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 02:01 PM IST

चुकीच्या मानसिकतेने विराट मैदानात उतरला- आशिष नेहरा

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिल्या कसोटीची सुरुवात अपेक्षेपेक्षा वेगळीच झाली. लंचपर्यंत टीम इंडियाचे ५६ धावावर ४ गडी बाद झाले होते. विराटला पहिल्या दिवशी धावांचा डोंगर उभा राहण्याची अपेक्षा होती. मात्र त्याच्या अपेक्षेप्रमाणेच काहीच घडलं नाही.

हे वर्ष कोहलीसाठी फार खास होतं. त्यामुळे त्याच्या मनात धावांचा पाऊस पाडण्याचा विचार येणं अगदी सहाजिक आहे.

सामना सुरू झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली. स्वतः विराट १६ चेंडूत ३ धावा करून माघारी परतला. कोहलीसह इतर सर्व फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राइव्ह खेळण्यात बाद झाले.

Loading...

भारताचा माजी खेळाडू आशिष नेहराला कोहलीचा हा अंदाज अजिबात आवडला नाही. सोनी सिक्समध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन करताना कोहलीला त्याचा अतिआत्मविश्वास नडला असे नेहरा म्हणाला.

नेहरा म्हणाला की, विराट कोहली जेव्हा इंग्लंडला गेला होता, तेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करायचे होते. त्यामुळे १४९ धावांची खेळी खेळताना त्याच्यात सहजता दिसली.

तेव्हा तो ड्राइव्ह खेळतच नव्हता, त्यामुळे एक वेगळा कोहली सर्वांना पाहायला मिळत होता. मात्र एडिलेड कसोटी सामन्यापूर्वी कोहलीने जे वक्तव्य केलं ते मला योग्य वाटलं नाही. ‘ऑस्ट्रेलियामध्ये मला काहीही दाखवून द्यायचं नाही,’ असं वक्तव्य विराटने केलं होतं.

त्याच्या या बोलण्याचा अर्थ असा होता की, त्याने याआधीच ऑस्ट्रेलियामध्ये धावांचा पाऊस पाडलेला आहे. त्यामुळे आता वेगळं काही सिद्ध करुन दाखवायची गरज नाही.

यावर नेहरा म्हणाला की, ‘त्याला हे कळायला हवं की चार वर्षांपूर्वी त्याने या धावा केल्या होत्या. तो अशा बेफिकरीने खेळू शकत नाही.’ कोहलीने १६ चेंडूत ३ धावा केल्या. त्यातील ७ चेंडूवर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. ही चूक त्याने इंग्लंडमध्ये केली नव्हती. हीच चूक त्याला महागात पडली.

हरभजन सिंहने कोहली पाठराखण करताना म्हटले की, ‘तो त्याच्या चुकांमधून शिकेल. तो ही चूक दुसऱ्यांदा करणार नाही.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...